लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अमन मुल्लाच्या दोन्ही डावातील भेदक गोलंदाजीसह श्रेयस केळकर व रोहित करंजकरच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर २२ यार्डस क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटरच्या सिंहगड रस्त्यावरील मैदानात खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय लढतीत आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात व्हिजनचा डाव ६३.५ षटकांत १९६ धावांवर संपुष्टात आला. प्रत्त्युत्तरात २२ यार्ड्स संघाला विजयासाठी १३२ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान २२ यार्डस संघाने ३४.३ षटकांत ७ बाद १३३ धावा करून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक: पहिला दिवस : पहिला डाव : व्हिजन क्रिकेट अकादमी : ७३.१ षटकांत सर्वबाद २३३ धावा वि २२ यार्डस : ६५ षटकांत सर्वबाद २९७ धावा; २२ यार्डस संघाकडे पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी;
दुसरा डाव : व्हिजन क्रिकेट अकादमी : ६३.५ षटकांत सर्वबाद १९६ धावा, अक्षय पांचारिया ५९, मयूर खरात ३२, हृषीकेश मोटकर २७, प्रीतेश माधवन २६, शौनक त्रिपाठी १६, प्रज्ञेश बराटे ३-५५, नितीश सालकर १-१८, आर्शीन देशमुख २-३९, अमन मुल्ला २-६३ पराभूत वि. २२ यार्डस : ३४.३ षटकांत ७ बाद १३३ धावा, रोहित करंजकर ३५, श्रेयस केळकर २७, अभिमन्यू सिंग चौहान ३०, योगराज देशमुख १४, रणजित मगर ११, गणेश जोशी ३-४६, अक्षय पांचारिया २-४०, आर्य जाधव २-२६; सामनावीर - अमन मुल्ला; २२ यार्डस संघ ३ गडी राखून विजयी.