शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी गावे सरसावली, ‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:21 IST

गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन तसेच कृषी, आरोग्य आदी बारा क्षेत्रांत केलेल्या कामाची नोंद घेऊन या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाºया सरपंचांना जिल्हा पातळीवर ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड-२०१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत. या बारा पुरस्कारांसह सर्वांगीण काम असणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ हा अ‍ॅवॉर्डही दिला जाणार आहे. याच सरपंचांचे पुढे राज्यपातळीवरील अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन होणार आहे. त्यातून या विभागांतील राज्यस्तरावरचे पुरस्कारार्थी निवडले जातील.आदर्श सरपंचांचा शोध घेत त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी व इतरांना प्रेरणा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरपंच स्वत: या पुरस्कारांसाठी आपले नामांकन दाखल करू शकतात. याशिवाय जनताही त्यांना आदर्श वाटणाºया सरपंचांचे नामांकन दाखल करु शकते. ‘लोकमत’चे ज्युरी मंडळ या नामांकनाची छाननी करुन पुरस्कारार्थींची निवड करणार आहे.चला सहभागी होऊ या१ नोव्हेंबर २०१६ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या काळात सरपंचपदावर कार्यरत असलेले आजी, माजी व नवनियुक्त सरपंच या पुरस्कार योजनेत आपले नामांकन दाखल करू शकतील. नामांकनासाठीच्या प्रवेशिका ‘लोकमत’च्या जिल्हा व विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहेत.www.lokmatsarpanchawards.in  या संकेतस्थळावर सरपंच तसेच नागरिकही पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करू शकतात. अधिक माहितीसाठी ९९२३३७८४७६, ९९२०१७९२८२ या क्रमांकांवर संपर्क करावा.पुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ नागपूरभंडारा औरंगाबाद लातूररायगड अहमदनगर धुळेजळगाव नाशिक कोल्हापूर पुणेसांगली सातारा सोलापूरपुरस्कारांची वर्गवारीआणि निकष1 जलव्यवस्थापन : गावाला पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत,पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन.2वीज व्यवस्थापन : गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीज निर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग.3शैक्षणिक सुविधा : गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे प्रयोग.4स्वच्छता : प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रुप, कचरा संकलन पद्धत, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्ती5आरोग्य : आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठीचे प्रयोग, लसीकरण, साथरोगांबाबतचे व्यवस्थापन.6पायाभूत सेवा : रस्ते, वीज, पाणी, कम्युनिकेशन, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, मार्केट या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोय7ग्रामरक्षण : तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला-युवती-बाल सुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना8पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जल व वायूप्रदूषण, कुºहाडबंदी, चराईबंदी, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण ( उदा. वाळूउपसाबंदी)9प्रशासन/ ई-प्रशासन / लोकसहभाग :ई-पंचायत व पंचायतकडून दिल्या जात असणाºया आॅनलाईन सेवा, गावकºयांकडून होत असलेला आॅनलाईन सेवांचा वापर, ग्रामसभा व इतर विकास कामांतील लोकसहभाग, कर संकलन, योजनांची अंमलबजावणी, निधी खर्चाचे प्रमाण, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत10रोजगार निर्मिती : ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेतकरी कंपन्या, सामूहिक शेती11उदयोन्मुख नेतृत्व : कुठलीही पार्श्वभूमी नसताना गावाच्या विकासात नावीन्यपूर्ण सहभाग देत असलेला तरुण सरपंच.12कृषी तंत्रज्ञान : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर,सेंद्रीय शेती13सरपंच आॅफ द इयर : विविध क्षेत्रात सर्वांगीण योगदान देणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ अवॉर्डने गौरविले जाईल.