शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पोलिसांच्या निषेधार्थ गावे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 02:36 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध : नीरा नदी दूषित करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही

सांगवी : बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात १५० आंदोलकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सांगवीसह परिसरातील गावे कडकडीत बंद ठेवून पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध करण्यात आला.

नीरा नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या संबंधितांवर प्रशासनाला कारवाई करण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आठ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही; त्यामुळे सोमवारी (दि. २५) बारामती-फलटण रस्त्यावर नीरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी १५० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, खांडज, नीरावागज, मेखळी, सोनगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नीरेचे पाणी हा आमच्या जगण्याचा आधार आहे. बारामतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आधी सत्य परिस्थिती पाहून मगच पावले उचलावीत. न्याय मागणाºयांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावात असल्याचे सिद्ध होत असल्याचे या वेळी आंदोलकांनी सांगितले.

शेती नापीक होत चालल्याने घरदार सोडून जाण्याची वेळ आली आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीभोवतीचे पाणीस्रोतदेखील दूषित झाले आहेत. त्यामुळे गंभीर आजारांचादेखील सामना येथील रहिवाशांना भविष्यात करावा लागेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, माजी अध्यक्ष किरण तावरे, विजय तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष युवराज तावरे, महेंद्र तावरे, अनिल सोरटे, सुहास पोंदकुले, वीरेंद्र तावरे, सचिन पोंदकुले यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीरा नदीच्या प्रदूषणावरून आंदोलन करणाºया शेतकºयांवर खोटे गुन्हे दाखल होतात; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या परवानगीने बारामती तालुक्यात बेकायदेशीरपणे मटका, दारू, जुगार या राजरोसपणे चालणाºया अवैध धंद्यांच्या माध्यमातून ग्रामीण पोलिसांना बेसुमार हप्ते मिळतात. यामुळे तिथे कारवाई होत नाही.

‘अवैध धंदे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशी अवस्था पोलीस अधिकाºयांची झालेली आहे. यामुळे ते बाहेर काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा कडक इशाराच गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. तर, पोलीस प्रशासनाच्या निषेध सभेत अवैध धंद्यांचा विषय निघण्याची चाहूल लागताक्षणी बारामती ग्रामीण पोलिसांनी दोन दिवस अगोदर दारूअड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आंदोलकांवर केलेल्या कारवाईमुळे काही संतप्त आंदोलक अवैध धंद्यांचा विषय काढतील, या भीतीपोटी पोलिसांनी दारूअड्ड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा चांगलीच रंगली.प्रदूषित पाणी बंद करण्याचा अधिकार प्रांत यांनादेखील आहे. ब्रिटिशांनी १८६०मध्ये हा कायदा केलेला आहे. ग्रामस्थांनी प्रांत यांना तसे निवेदन दिल्यास २४ तासांत प्रांताधिकारी संबंधिताला तशा प्रकारे नोटीस बजावू शकतात. निवेदन देऊन देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे यातून असे दिसून येते, की अधिकाºयांनाच काही कायद्यांची माहिती नाही. यामुळे पोलीस अधिकाºयांनी खटले दाखल केले असल्याचे मत अ‍ॅड. भगवानराव खारतोडे यांनी व्यक्त केले.नीरा नदीत जाणारे दूषित पाणी कायमचे बंद होऊन संबंधितांवर कारवाई होत नाही. त्यामुळे आमच्या भावना पोहोचण्यासाठी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाºयांना काळ्या पाण्याने अंघोळ घालून आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणारच, असा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला आहे.