शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बिबट्याबरोबर सहजीवनाचे ग्रामस्थांना मिळणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 13:40 IST

बिबट्याची भीती आहे, दहशत आहे, बिबट्यांची वाढती संख्या देखील मोठी

ठळक मुद्देवनविभागाचा अनोखा उपक्रम : ‘बिबट चित्ररथ’ उपक्रम आता गावोगावीया उपक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद जुन्नर तालुक्यात २००२ पासून बिबट्यांचा वावर आणि पशुधनावरील हल्ले वाढले

जुन्नर ( खोडद ) : अलीकडच्या काळात बिबट्यांचा वाढता वावर, बिबट्यांचे पशुधनावर  होणारे वाढते हल्ले आणि माणसाबरोबर बिबट्यांची होत असलेली सलगी या सगळ्यांची सांगड घालत आता जुन्नरवनविभागाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना बिबट्याविषयी आता रेस्क्यू प्रशिक्षण देणारा आणि जनजागृती करणारा ‘बिबट चित्ररथ’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.बिबट्याची भीती आहे, दहशत आहे, बिबट्यांची वाढती संख्या देखील मोठी आहे. कधी कधी तर दिवसाढवळ्याही तो पशुधनावर हल्ले करून आपली भूक भागवतो, तर कधी कधी दिवसाढवळ्या नागरिकांना दर्शन देऊन तो नागरिकांच्या तोंडचं पाणीही पळवतो. पशुधनावर होणारे हल्ले आणि त्यांचा वावर यामुळे त्रस्त असूनदेखील वेळप्रसंगी आणि दुर्दैवाने त्याच्याकडून चुकून माणसावरही हल्ला होतो. तरीदेखील हा माणूस बिबट्याला त्याचा मित्रच मानतोय.बिबट्या काहीही करत नाही, आपण त्याला डिवचले तरच तो आपल्यावर हल्ला करेल; नाहीतर तो त्याच्या मार्गाने निघून जाईल, अशी मानसिकता आता जुन्नरकरांची झालेली पाहायला मिळत आहे. बिबट्याबरोबर माणसालाजुळवून घ्यावे लागणार आहे.............जुन्नरचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या संकल्पनेतून व सहायक वनसंरक्षक दिलीप भुरके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वनकर्मचारी व रेस्क्यू टीम प्रशिक्षण’ हा उपक्रम ‘बिबट चित्ररथा’द्वारे सुरू करण्यात आला आहे. हा चित्ररथ प्रत्येक गावागावांत जाणार आहे. च्नारायणगाव वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे व वनरक्षक मनीषा बनसोडे या वनकर्मचारी ‘बिबट चित्ररथा’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना बिबट्याविषयी विस्तृत माहिती देत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमातून बिबट्याची उत्पत्ती व वाढती संख्या, त्याचा आहार, त्याच्या सवयी, त्याची शिकार करण्याची पद्धत, त्याचा निवास, त्याची आक्रमकता, पशुधनाचा बचाव कसा करावा, नागरिकांनी काळजी कशी घ्यावी? आणि बिबट्याविषयी अन्य इतर माहिती या उपक्रमातून दिली जात आहे.............वनविभागाने सुरू केलेल्या ‘बिबट चित्ररथा’च्या माध्यमातून वनकर्मचारी गावोगावी जाऊन विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधत आहेत. या संवादातून सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. या चर्चेतून बिबट्यांविषयी विद्यार्थी व नागरिकांच्या मनात असणारे अनेक गैरसमज यातून दूर होत आहेत. हा ‘बिबट चित्ररथ’ प्रत्येक गावात पाठवला जाणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थी व नागरिक आपापल्या मनातील शंका व प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थी व नागरिकांच्या मनातील बिबट्याविषयी असलेली भीती, गैरसमज व नकारात्मक भावनादेखील दूर होऊ लागली आहे.- जयरामे गौडा, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग................जुन्नर तालुक्यात २००२ पासून बिबट्यांचा वावर आणि पशुधनावरील हल्ले वाढले आहेत. बिबट्यांचा जुन्नर तालुका म्हणून बिबट्याने आता जुन्नरला ही नवीन ओळख दिली आहे. या तालुक्यात बिबट्यांची संख्या आणि त्याचा वावर प्रचंड वाढतो आहे...........पशुधनाच्या हल्ल्यात वाढ झालेली असतानाच मानवी हल्ल्यांचे प्रमाण नगण्य आहे. बिबट्या पाहतोय आणि माणूस बिबट्याला पाहतोय पण बिबट्या माणसावर हल्ला करीत नाही............... 

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभाग