शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडला केळवडे ग्रामस्थांचा विरोध : विश्वासात न घेतल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:24 IST

ग्रामस्थ उभारणार तीव्र आंदोलन..

ठळक मुद्देभूसंपादन झाल्यास येथील ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकरी नुकसानीमुळे झाला हतबल

नसरापूर : वेगवान वाहतुकीसाठी जिल्ह्यातील प्रस्तावित चक्राकार मार्गाला (रिंगरोड) केळवडे येथील शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. रिंगरोडचा आराखडा तयार करताना आमच्या जमिनी यात जात असून, आमचा कुठलाही विचार प्रशासनाने केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या रस्त्यासाठी आम्ही आमची इंचभरही जमीन देणार नाही. त्यामुळे या रस्त्याच्या आखणीचा पुनर्विचार करावा अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.जिल्ह्यात वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. हा रस्ता भोर तालुक्यातील केळवडे येथून जातो. केळवडे हे गाव हे कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. ७० टक्के नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. येथील शेतकऱ्यांना ० =४० व ० =६० आर असे कमी क्षेत्र आहे. त्यांच्या या जमिनीवरून रिंगरोड प्रस्तावीत झाला असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी नसरापूर येथे ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ५) बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी  शासनाने रिंगरोडसाठी सर्व शेतकºयांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतलेला आहे. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करु नये. अन्यथा  येथील शेतकरी उग्र आंदोलन करतील, असा इशारा या बैठकीत शेतकऱ्यांनी दिला.  या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर जायगुडे, सरपंच शांताराम जायगुडे, माजी सरपंच संदीप खुळे, विलास कोंडे, बाळासाहेब कोंडे, राजेंद्र कोंडे, महेश मरळ, जितेंद्र कोंडे, रवींद्र धुमाळ, जीवन कोंडे, मोहन धुमाळ, सचिन कोंडे, संपत कोंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.........पुणे जिल्ह्यातील रा. म. लगेच या केळवडे- कांजळे - खोपी- कुसगाव - रांजे (तालुका भोर) रहाटावडे - कल्याण-घेरा सिंहगड - खामगाव मावळ - वरदाडे -मालखेड - मांडवी बुदुक - सांगरुण- बहुल्ली (तालुका हवेली) कातवडी - मुठा - मारणेवाडी - आंबेगाव - उरवडे कासार आंबोली - भरे - आंबडवेट - घोटावडे - रिहे - पडाळघरवाडी - जावळ - केमसेवाडी पिंपळोली (तालुका मुळशी) पाचाणे - चांदखेड बेबड ओहोळ धामणे - परंदवाड़ी व उर्स (मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ)(तालुका मावळ) येथे संपणाच्या या नवीन रस्त्याच्या आखणीस विशेष राज्य मार्ग म्हणून शासनाच्या वतीने मंजुरी देणार असल्याचे समजते........

अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकरी नुकसानीमुळे हतबल झाला आहे. त्यातच शासनाने केळवडे ते उर्से मार्गावरील रिंगरोडसाठी बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. .केळवडे ते उर्से रिंगरोड संदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नसून या रिंगरोडविरोधात केळवडे येथील ग्रामस्थ, बळीराजा शेतकरी संघटना यांनी आम्हास निवेदन दिले आहे.- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी, भोर.....

भूसंपादन झाल्यास येथील ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळेच भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उपस्थितांनी दिला...........केळवडे ते उर्से  रिंगरोड संदर्भात शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहे.- श्यामसुंदर जायगुडे, संपर्कप्रमुख, बळीराजा शेतकरी संघटना 

टॅग्स :Puneपुणे