शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चार टप्यात गावनिहाय मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:11 IST

खेड तालुक्यात शुक्रवार दि.१५ जानेवारी ला सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले.८२.०४% एकुण मतदान झाले.२४४ प्रभागातील ४९४ जागांसाठी ११०४ उमेदवार ...

खेड तालुक्यात शुक्रवार दि.१५ जानेवारी ला सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले.८२.०४% एकुण मतदान झाले.२४४ प्रभागातील ४९४ जागांसाठी ११०४ उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात होते.ता.१५ जानेवारीला ग्रामपंचातनिहाय मतदान सुरळीत पार पडले.येणिये बु,जैदवाडी,पिपंरी बु., खरोशी,खरपुडी येथील काही प्रकार वगळता आणि मतदान सुरु होतानाच मोहकल ,तोरणे बु.येथील कंट्रोल आणि बँलेट युनीट यत्रं तर कमान येथे एका केंद्रावरचे बँलेट युनीट बदलावे लागले होते. ८० ग्रामपंचायतीच्या एकुण २४४ प्रभागातील १ लाख २५ हजार २७९ मतदारांपैकी १ लाख २ हजार ७७९ मतदारांनी मतदान केले.यापैकी ६५ हजार २०२ पुरुष मतदारांपैकी ५४ हजार११३ (४३.१९%) मतदान केले तर एकुण ६० हजार ७६ पैकी ४८ हजार ६६६ महिला मतदारांनी ( ३८.४४% ) मतदानाचा हक्क बजावला.

सोमवार दि. १८ जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुलात मतमोजणीला प्रत्यक्षात सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.पहिल्या टप्यातील मतमोजणी होणा-या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधी अथवा उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे. एका टप्यातील मतमोजणीला दीड तास धरण्यात आला आहे.त्यानुसार आपले गावाची मतमोजणी किती वाजता होऊ शकते त्यानुसार उमेदवार प्रतिनिधीनी उपस्थित राहावे. मतमोजणी केंद्रावर उमेदवार अथवा नेमण्यात आलेल्या प्रतिनिधीनी ओळखपत्र देण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रांत येताना मोबाईल बंदी करण्यात आली आहे.तसेच तोंडावर मास्क असेल तरच आता प्रवेश दिला जाईल. निकालानंतर गावात मिरवणुका काढण्यास बंदी आहे.तरी सर्वानी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रांत संजय तेली,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायती :मेदनकरवाडी, कडूस,काळुस,पूर,किवळे,वासुली,

च-होली खुर्द,टाकळकरवाडी, तुकईवाडी, वाजवणे, गोनवडी,अहिरे, पाळू, आसखेड खुर्द,राक्षेवाडी,नायफड,

दूस-या टप्प्यातील ग्रामपंचायती:

नाणेकरवाडी,तोरणे बु,बिरदवडी,चिंचबाईवाडी,वाकी खुर्द, घोटवडी, वेताळे,शिंदे,चिंबळी, दावडी,रेटवडी,गडद,

कुरकुंडी,सावरदरी,म्हाळुंगे,वांद्रा,मोहकल,करंजविहरे,दोंदे,कान्हेवाडी तर्फे चाकण,जऊळके बु.,पिंपरी बु.,खरोशी,

धानोरे ,

तिस-या टप्प्यातील ग्रामपंचायती :गोलेगांव,मरकळ, वाकळवाडी,कमान,आवदर,शिरगांव

,कनेरसर,चांडोली,औंढे,चिंचोशी,खरपुडीखुर्द,शिवे,धामणगांव खुर्द, कडधे,वडगांव न खेड,वराळे,शेलू,वरची भांबुरवाडी, बुरसेवाडी (बिबी),सांगुर्डी,कळमोडी,

चांदूस,कोयाळी तर्फ चाकण,रासे,पांगरी,आखरवाडी,वि-हाम, टोकावडे.

चौथा टप्प्यातील ग्रामपंचायती :- भोसे,केळगांव,जैदवाडी,कान्हेवाडी बु.,खरपुडी बु,आंबोली,गोसासी,येणिये बु, निमगांव,वाफगांव,

ढोरे भांबुरवाडी,भोरगिरी,

मतमोजणीसाठी ३२ टेबलवर १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असुन उमेदवार आणि नियुक्त प्रतिनिधीना स्वंतत्र ओळखपत्र देण्यात आलेले आहे.मतदानासाठी देण्यात आलेल्या ओळखपत्रावर सोडले जाणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावे आवाहन निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर आणि महसुल नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी केले आहे.