सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय ३४, रा.उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्श्वभूमीवर जिल्ह्यात कोंबींग ऑपरेशन राबविले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस ठाणे स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती. शनिवार (दि ९) रात्री १०.३० च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांचे पथक हेस्त घालत होते. या वेळी एक व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून सोमनाथ कांचन यांस अटल केली. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस सापडले. त्याला अटक करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चौकट
सोमनाथ कांचन याची उरुळी कांचन परिसरात दहशत असून बऱ्याच लोकांना तो दमदाटी व मारहाणसुद्धा करायचा. परंतु तो स्थानिक असल्याने व त्याच्या भीतीने लोक पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नसत. काही राजकीय पुढारी निवडणुकीसाठी त्याचा वापर करत असल्याची माहिती मिळाली आहे.