शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

विक्रम वडतिले ठरला मानकरी

By admin | Updated: May 4, 2017 02:30 IST

कुस्त्यांच्या आखाड्यात विक्रम वडतिले यांनी मानाची गदा पटकावली.समस्त ग्रामस्थ मंडळी व श्री बापदेवमहाराज उत्सव समितीच्या

किवळे : येथील ग्रामदैवत श्री बापदेवमहाराजांच्या उत्सवाला रविवारी पहाटेपासून उत्साहात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी अभिषेक, महापूजा पालखी मिरवणूक, छबिना, पुषवृष्टी, हरिजागर आदी धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात विक्रम वडतिले यांनी मानाची गदा पटकावली.समस्त ग्रामस्थ मंडळी व श्री बापदेवमहाराज उत्सव समितीच्या वतीने सकाळी सात वाजता श्रींची महापूजा व अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी गावचे पोलिस पाटील दिलीप तरस यांच्या हस्ते झाले. सायंकाळी बापदेवमहाराजांच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशा पथकांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांवर काढण्यात आली होती. पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणुकी पुढे उंट व घोडे होते. गावठाणातील विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिजागराचा कार्यक्रम झाला. उत्सवानिमित श्री बापदेवमहाराजांच्या मंदिरासह गावातील विविध देवदेवतांच्या मंदिरांवर रोषणाई करण्यात आली. दर्शनासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. मनोरंजनासाठी रात्री किरण ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा वगनाट्याचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. दुपारी बारानंतर श्री बापदेवमहाराजांचा वार्षिक भंडारा उत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थाच्या वतीने भंडाऱ्याचा प्रसादवाटप करण्यात आला. सर्व कार्यक्रमाचे संयोजन बापदेवमहाराज उत्सव समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी केले. रंगलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात विविध वजन गटानुसार लढती झाल्या. विक्रम वडतिले बापदेव किताबाचा मानकरी ठरला. पुणे, पिंपरी-चिंचवड, हवेली, मावळ व मुळशीतील विविध नामवंत तालमीतील तसेच जिल्ह्याबाहेरील मल्लांनीही हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बापदेवमहाराज मंदिराजवळ कुस्त्यांच्या आखाड्याला सुरुवात झाली. आखाड्याचे पूजन खासदार श्रीरंग बारणे, कुस्ती परिषदेचे सरचिटणिस बाळासाहेब लांडगे, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेब तरस व नवनाथ तरस यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामस्थ व उत्सव समितीच्या सर्व सभासदांनी संयोजन केले. (वार्ताहर) रोख इनाम : गटनिहाय लढतींचे नियोजनपैलवानांना पाचशे एक रुपयांपासून एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत रोख इनाम देण्यात आले. शेवटची कुस्ती विक्रम वडितले विरुद्ध नागेश शिंदे यांच्यात झाली. यात वडितले विजयी झाल्याने त्याला दत्तात्रय तरस व शशिभाऊ सहस्रबुद्धे यांच्याकडून रोख ५१ हजार रुपये तसेच गोरख (दादा) तरस व नवनाथ लोखंडे यांच्या वतीने श्री बापदेवमहाराज किताब, चांदीची गदा देण्यात आली. शहर कुस्तीगीर संघटनेचे संतोष माचुत्रे, चंद्रकांत मोहोळ यांनी वजन गटानुसार कुस्त्यांचे नियोजन केले. पंच म्हणून शंकर कंधारे, बाळू काळजे, विजय कुटे, संजय दाभाडे, खंडू वाळुंज यांनी काम पाहिले. निवेदन बाबसाहेब लिमन यांनी केले.