शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभास लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततेत विजयदिन; समता सैनिक दलाची शिस्तबद्ध कवायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:19 IST

पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभास सोमवारी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली.

लोणीकंद - पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभास सोमवारी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली.१ जानेवारी १८१८ रोजी पेशवे व ब्रिटिश यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. यात ब्रिटिश विजयी झाले. या प्रीत्यर्थ ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिली. तेव्हापासून १ जानेवारी रोजी राज्यातील दलित बांधव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात.या निमित्त विजयस्तंभ व परिसराला फुलांची सजावट केली आहे. प्रवेशद्वार जाण्या-येण्याचे रस्ते व विजयस्तंभ संपूर्ण फुलांनी सजवून आकर्र्षित केला होता. भारतीय बौद्ध महासंघाच्या अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्र्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष विवेक चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, भीमशक्ती युवा सेना अध्यक्ष विलास इंगळे, बहुजन समाज पार्र्टीचे अध्यक्ष विलास गरुड, जिल्हा अध्यक्ष बाळासाो. आवारे आदींनी समर्थकांसह मानवंदना देऊन स्वतंत्र अभिवादन सभा घेतल्या.भारतीय बौद्ध महासंघ प्रणीत समता सैनिक दलाने शिस्तबद्ध कवायत करुन सलामी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज व भारतीय बौद्ध महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी सलामी स्व्ीाकारून मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहिले. या वेळी मनीषा आंबेडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड, उत्तम मगरे, अशोक कदम, दादासाहेब भोसले आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ४०० पोलीस, १०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त तैनात होता.प्रचंड गर्दी : जत्रेचे स्वरूपप्रारंभी विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने रात्री १२ वाजता विजयोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सर्व सहकाºयांनी परिश्रम घेतले.पुणे-नगर रस्ता गर्दीने भरून गेला होता. जड वाहनांना बंदी केली होती. पुण्याकडे जाणारी वाहने शिक्रापूर येथून तर पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने वाघोली येथून अन्यत्र वळवली होती. तुळापूर फाटा ते कोरेगाव भीमापर्यंतचा रस्ता वाहनमुक्त होता. तरीही रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती.विजयस्तंभाच्या पाठीमागे विविध पुस्तकांचे स्टॉल व खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते. तसेच पाळणे, खेळणी यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या