ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 30 - महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊन इच्छुक उमेदवार मतदारांच्या मागे फिरतील. मात्र, त्याआधीच निवडणुकीच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांना गोल गोल फिरण्याची वेळ आली आहे. मतदान केंद्रावर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना लावायच्या आहेत. शहरातील तब्बल साडेतीन हजार मतदान केंद्रावर या सूचनांचे गठ्ठे पाठवायचे आहेत. यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी एका टेबलवर या सूचनांचे गठ्ठे ठेवेलेले आहेत. या सूचनांचा गठ्ठा मतदान केंद्रनिहाय तयार करायचा आहे. त्यासाठी कर्मचारी गोल गोल फिरून हे गठ्ठे तयार करत आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844q7g