शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

भोरमध्ये रस्त्यावर पडलेल्या झाडाने घेतला तरुणाचा बळी

By admin | Updated: October 10, 2016 02:16 IST

एसटी डेपोजवळ रस्त्यात पडलेल्या झाडाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार व दुसरा गंभीर जखमी झाला आहे

भोर : एसटी डेपोजवळ रस्त्यात पडलेल्या झाडाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार व दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडला.राहुल विठ्ठल दूरकर (वय २५, रा. गुठाळे, ता. खंडाळा, सातारा) जागीच ठार झाला. अक्षय विठ्ठल महांगरे गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी, शहरातील भोर-शिरवळ रस्त्यावर एसटी डेपोजवळ भररस्त्यात सकाळी ११ वाजता बाभळीचे झाड पडले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काढले नाही. कोणताच सूचनाफलकही लावला नाही. यामुळे झाडाचा अंदाज न आल्याने पाच ते सहा दुचाकी घसरून अपघात झाले होते. मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही. रात्री अंधारामुळे रस्त्यात पडलेले झाड दिसले नाही. त्यामुळे दुचाकीवरून (एमएच ०६-७९८४) जाणारे अक्षय व राहुल यांची गाडी झाडावर आदळली. दोघेही रस्त्यावर पडले. यात राहुल जागीच ठार झाला. अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले. दोघेही गोदरेज कंपनीत कामाला होते.दरम्यान, अपघातानंतर मृत आणि जखमी तरुणांना रुग्णालयात घेऊन जाण्यास रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने खासगी गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. यातून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिसून येतो. (वार्ताहर)