शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वेगमर्यादा ३०; पण वाहने सुसाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:17 IST

पुणे-सातारा रस्ता चव्हाणनगर कमानीजवळ शंकरमहाराज पूल सुरू होतो येथे सहकारनगरकडून येणारा रस्ता- स्वारगेटकडून येणारा रस्ता तसेच कात्रजकडून उड्डाणपुलावरून येणारा रस्ता येथे

सहकारनगर : पुणे-सातारा रस्ता चव्हाणनगर कमानीजवळ शंकरमहाराज पूल सुरू होतो येथे सहकारनगरकडून येणारा रस्ता- स्वारगेटकडून येणारा रस्ता तसेच कात्रजकडून उड्डाणपुलावरून येणारा रस्ता येथे जोडले जातात. तिन्ही बाजुने येणारी वाहने असल्याने हा चौक गजबजलेला असतो.येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक गुंतागूंत पाहण्यास मिळते.जवळच अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती मंदिर, महावितरणचे आॅफिस, स्वामी विवेकानंदांचे स्मारक असा परिसर असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. धनकवडी, बालाजीनगर, पद्मावती, बिबवेवाडी येथील नागरिकांच्या वर्दळीचा परिसर असल्याने बाहेरून येणारी वाहने परस्पर कात्रजकडे जाण्यासाठी शंकरमहाराज उड्डाणपूल मोठ्या प्रमाणात वापरतात.या भागात वेगमर्यादा ३० किलोमीटर असूनही उतारामुळे वाहने अतिशय सुसाट वेगाने येतात. त्यामुळे उताराकडे जो सिग्नल आहे त्याच्या अलीकडे आणखी स्पीडब्रेकर होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.या भागात वसलेली जुनी गुरुराज सोसायटी यातील ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांच्या साठी रस्ता ओलांडणे म्हणजे मोठे दिव्यच पार पाडावे लागते. काही दिवसांपूर्वी येथील गुरुराज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडताना अपघातात जखमी झाले होतेया चौकात रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत काही महिन्यापूर्वी रात्री चारचाकी गाडी उलटी झाली. मात्र, या उपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. लहान बाळ बचावले गेले.वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती व वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यास येथे पादचारी मोकळा श्वास घेऊ शकतील. चौकात अनधिकृतपणे उभ्या राहणाºया ट्रॅव्हल कंपनीच्या बसकडेही वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.