तोरणा प्रतिष्ठान वेल्हे व भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवानिमित्त कै. संतोष भुरूक, ज्ञानेश्वर मोरे, राजेंद्र पंडित यांच्या स्मरणार्थ मेंगाई मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार शिवाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी शंकर भुरूक, आनंद देशमाने, सरपंच संदीप नगीने, शिवराज शेंडकर, सुनील कोळपे, किरण राऊत, विलास पांगारे, प्रदीप मरळ आदी उपस्थित होते.
कै. राजेंद्र पंडित यांच्या स्मरणार्थ पंडित कुटुंबाकडून रक्तदात्यास एक घड्याळ भेट देण्यात आले. या वेळी नीलेश पवार, महेश पांगारे, सुनील राजिवडे, संदीप रेणुसे, विकास गायखे ,विलास भुरूक, संजय पंडित, अभिजित शेंडकर, सोमनाथ पांगारे, अमर कडू, अनुरूप कदम, प्रवीण वालगुडे, विनोद भुरूक, मनोज पवार, तुषार बरगजे, मनोज भुरूक, ओमकार देशमाने, प्रदीप मळेकर, विशाल पवार, कल्पेश देवगिरकर, नाना शिंदे, संपत पवार, निखिल पवार, गणेश गायखे उपस्थिति होते. प्रास्ताविक अक्षय भुरूक व ऋषि जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सागर मळेकर यांनी केले. आभार गोरक्ष भुरुक, सुनील राजिवडे यांनी मानले.