शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टराच्या वेशात येऊन तो करायचा वाहनचोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:59 IST

पुणे : डॉक्टरांना समाजात नेहमीच आदराचे स्थान असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन पांढरा अ‍ॅप्रन घालून त्यावर नेमप्लेट लावत असे़ असा ...

पुणे : डॉक्टरांना समाजात नेहमीच आदराचे स्थान असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन पांढरा अ‍ॅप्रन घालून त्यावर नेमप्लेट लावत असे़ असा पेहराव करून तो रेकी करायचा व त्यानंतर वाहने चोरून घेऊन जात असे़ सलग दीड ते दोन वर्षे त्याचा हा उद्योग सुरू होता़ फरासखाना पोलिसांनी त्याचा बुरखा फाडला असून, त्याच्याकडून ३० वाहने जप्त केली.

शाहरुख रज्जाक पठाण (वय २२, रा़ बुधाची वाडी, बनपुरी, ता़ पुरंदर) असे त्याचे नाव आहे़ शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटना घडत असून, त्याचा शोध लागत नाही़ पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या़ यादरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी कर्मचारी शंकर कुंभार यांना माहिती मिळाली की, शाहरुख पठाण हा दुचाकी चोऱ्या करत आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे, उपनिरीक्षक पाटील, कर्मचारी अमेय रसाळ, केदार आढाव तसेच त्यांच्या पथकाने पठाणला सापळा रचून पकडले. चौकशी केली असता त्याने वाहने चोरल्याचे सांगितले. तपासात फरासखाना परिसरातील ८ गुन्ह्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीचे २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात २६ दुचाकी, ३ चारचाकी तसेच एक टेम्पो असा २७ लाख २५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.सासवड परिसरात अनेक वाहनांची विक्री४पठाण याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे़ तो काही दिवस मेडिकलच्या दुकानात कामाला होता़ तो डॉक्टर घालतात तसा अ‍ॅप्रन घालत असे़ त्यावर बी़ जे़ मेडिकलचा एमबीबीएस डॉक्टर असल्याची बनावट नेमप्लेटही लावत़ डॉक्टरांना आवश्यक असणाºया वस्तू एका बॅगेत घेऊन तो फिरत असे़ कोणी अडविल्यास आपण डॉक्टर आहे, चोर नाही, असे सांगून निसटता येईल, असा त्याचा त्यामागे विचार होता़ सासवडहून तो भाड्याने मोटार घेऊन येत असे़ त्यानंतर शहरात फिरुन वाहने चोरुन ती मोठ्या वाहनातून ती दुसरीकडे घेऊन जाऊन विक्री करत असे़ त्याने सासवड परिसरात अनेकांना वाहने विकली आहेत. त्याच्याकडून वाहने घेतलेल्या व मदत करणाऱ्यांचा तपास सुरू आहे.