शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप टेम्पोने अचानक बे्रक दाबल्याने वाहनांचे नुकसान

By admin | Updated: November 16, 2016 02:50 IST

मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत मालवाहतूक पिकअप टेम्पोच्या ड्रायव्हरने अचानक बे्रक दाबल्याने मागील बाजूला मालवाहतूक

अवसरी : मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत मालवाहतूक पिकअप टेम्पोच्या ड्रायव्हरने अचानक बे्रक दाबल्याने मागील बाजूला मालवाहतूक तीन चाकी टेम्पो धडकल्याने तीन चाकी वाहनाचे अदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.रविवारी सायंकाळी ५च्या सुमारास अवसरी खुर्द, वायाळमळा हद्दीत मालवाहू पिकअप टेम्पो (एमएच १२ केपी २८८३) मांडवगण फराटा, शिरूर येथून कांदाविक्रीसाठी मंचर कृषी उत्पन्न समितीत विकण्यासाठी चालला होता. वायाळमळा फाट्याजवळ टेम्पो जात असताना त्याला अचानक दोन कुत्री आडवी आल्याने वाहनचालकाने जागेवरच ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तीन चाकी मालवाहू (एमएच १७-टी ६९०५) वाहनाची टेम्पोला जोरदार धडक बसल्याने तीन चाकी टेम्पोचा पुढील भाग वाकला व काच फुटली. टेम्पोत असलेले ४० किलो गावठी तुपाचे कॅन पलटी होऊन टेम्पोचे व तुपाचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तीनचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक भाऊसाहेब शिंदे यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. या वेळी वाहनांचा रांगाच रांगा लागल्या होत्या. सारथी डेअरीचे मालक चंद्रकांत वळसे-पाटील निरगुडसर गावाचे माजी उपसरपचं रवींद्र वळसे-पाटील व स्थानिक रहिवाशांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)