शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आवक वाढल्याने भाज्या उतरल्या

By admin | Updated: January 23, 2017 02:25 IST

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव उतरले

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. रविवारी बाजारात १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली.आले, टोमॅटो, दोडका, दुधी भोपळा, चवळी, काकडी, कोबी, वांगी, ढोबळी मिरची, शेवगा, घेवडा, पावटा या भाज्यांच्या भावात घट झाली. इतर भाज्यांच्या भावात फारसा चढउतार झाला नाही. पालेभाज्या कोथिंबीर व मेथीची आवक तुलेनेने वाढल्याने भाव घटले. रविवारी कोथिंबीरची आवक सुमारे २ लाख जुडी, तर मेथीची सुमारे ५० हजार जुडी आवक झाली. कोथिंबीरला शेकडा जुडीमागे ३०० ते ६०० रुपये तर मेथीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. फळभाज्यांमध्ये कांद्याच्या भावातही काहीशी घट झाली. कांद्याला प्रति दहा किलो ५० ते ७५ रुपये भाव मिळाला. सातारी आले १२० ते १५०, भेंडी २५०-३५०, गवार ४०० ते ५००, टोमॅटो ३०-६०, हिरवी मिरची १८० ते २००, फ्लॉवर ५० ते ८०, कोबी २० ते ५०, वांगी ८० ते १२०, मटारला १५० ते २०० भाव मिळाला. साबुदाणा, तांदळाच्या भावात वाढपुणे : उत्पादनात घट झाल्याने घाऊक बाजारात साबुदाण्याची आवक रोडावली आहे. त्यामुळे भावात तेजी असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांदळाचे भावही वाढले असून शेंगदाणा उतरला आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात मागील आठवडाभरात मागणीच्या तुलनेत साबुदाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे भावात क्विंटलमागे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. तर आंबेमोहोर, कोलम, लचकारी कोलम या नवीन तांदळाची आवक कमी होत असल्याने भावात सुमारे ४०० ते ५०० रुपये वाढ झाली. मागणी कमी झाल्याने शेंगदाण्याचे भाव १०० ते १५० रुपयांनी उतरले. हरभराडाळ व तूरडाळीचे भाव मागील आठवडाभर स्थिर राहिले. बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० रुपयांनी वाढले. मागील महिनाभरापासून तेजीत असलेले गुळाचे भाव आठवडाभर टिकून राहिले. खाद्यतेल, गोटा खोबरे व नारळाचे भावही तेजीत आहेत. इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले.