शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीविक्री ‘स्वाइप’

By admin | Updated: November 16, 2016 02:48 IST

बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने

पिंपरी : बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने सुट्या पैशाविना भाजीखरेदी अवघड झाली आहे. दहा रुपयांची मेथीची भाजी असो किंवा ३० रुपये किलो बटाटे, टॉमेटो असा भाजीपाला खरेदीसाठी आता सुट्या पैशांची गरज भासणार नाही. त्यावर चिंचवड मंडईतील तरुणाने उपाय शोधला असून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर भाजीमाल खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध अभियान छेडले असून, मागील आठवड्यात एका रात्रीत पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे किरकोळ खरेदी करण्यासाठी नागरिकांना चलन उपलब्ध नाही. शंभर-पन्नासच्या नोटा बाजारात उपलब्ध नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. हातात पाचशे, हजाराची नोट असतानाही केवळ सुटे पैसे नसल्याने भाजी, किराणा मालाची खरेदी करणे अवघड झाले आहे. या विषयी गरुड म्हणाले, ‘‘भाजीपाला म्हटले, की सुट्या पैशांचा मोठा प्रश्न असतो. कधी-कधी सुट्या पाच रुपयांसाठी ग्राहकांना फिरण्याची वेळ येते. मात्र, डेबिट आणि के्रडिट कार्डाद्वारे स्वाइप करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने सुट्या पैशांची चणचण भासणार नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंडईतील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या सेवेसाठी आम्ही कोणताही वेगळा चार्ज आकारत नाही. त्यामुळे जेवढे भाजीपाल्याचे बिल आहे, तेवढेच बिल मशिनच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)