शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बारामती शहरात भाजीपाला लागवड यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:06 IST

६० गुंठे जमिनीत करतोय शेती : तरुणाने खासगी नोकरीपेक्षा मिळवला चांगला रोजगार

बारामती : बारामती शहराची ओळख विकसित शहरांमध्ये होते. शहराचा विकास होताना येथील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या. अनेकांनी जमिनी विकून इमारती उभ्या केल्या. अमाप पैसे मिळविले; मात्र शहरातील जमीन न विकता तीवर भाजीपाला लागवड करून येथील तरुणाने चांगले आर्थिक उत्पन्न मिळविले आहे. भरशहरात केलेली शेती शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

तरुण नोकरीच्या मागे न लागता अत्याधुनिक शेती जिद्द, कष्टाच्या जोरावर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकतात. याबाबत तरुण शेतकरी राहुल जाधव यांनी तरुणांना संदेश दिला आहे. त्यांनी बारामती शहरात फुलवलेली बाग नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. शहराच्या जवळचा बराचशा भागात इमारती उभारल्या, बंगले झाले, व्यावसायिक गाळे झाले. पण, या सगळ्यात अगदी शहराच्या मध्य भागात ६० गुंठे जमिनीत राहुल यांनी वेगळी वाट निवडली. त्यामध्ये त्यांनी ३० गुंठे अर्जुना जातीचे कारले व ३० गुंठे बायटर ग्राउंड पल्लवी जातीचा दोडका हे वाण लावले आहे. या दीड एकर क्षेत्रात त्यांनी जुलै २०१८मध्ये दोडका, कारले याची लागवड केली. यासाठी जाधव यांना १ लाख रुपये खर्च आला. त्याचप्रमाणे सर्व पिकाला ठिबक सिंचन केल्याने कमीत कमी पाणी लागते. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विंधनविहीर घेतली आहे. त्यानंतर दीड महिन्याने फळे लागली. पहिली तोडणी केली. सुरुवातीला पीक कमी होते; पण आता आठवड्यातून दोन वेळा दोडका व कारल्याची तोडणी करावी लागते. साधारण ४०० किलो दोडका व ३५० किलो कारले होते. याची विक्री पुण्याच्या बाजारात दर बघून केली जाते. तसेच, पुण्यात दर न मिळाल्यास बारामतीत मार्केटमध्ये भाज्या लिलावाला जातात. आठवड्याला सुमारे १५ हजार रुपये एवढी पट्टी मिळते. म्हणजे महिन्याला सरासरी ६० हजार रुपये उत्पन्न मिळते. दर वर्षाला खर्च वजा जाता नोकरदारापेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.

माळेगाव रोड व त्या भागातील शेतकरी उसासारख्या पिकाला दीड वर्ष वाट बघत बसतात. त्यापेक्षा दोडका, कारले अशा पिकांची लागण करून २ महिन्यांत उत्पन्न सुरू होते. दोडका साधारणपणे ६ महिने व कारले १० महिन्यापर्यंत फळ देते; पण त्यासाठी कष्टाची मात्र तयारी हवी. सुशिक्षित असतानादेखील आधुनिक शेती व मेहनतीच्या जोरावर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात, असे राहुल सांगतात.ठिबक सिंचन केल्यामुळे पिकांचे रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन करणे सोपे जाते. श्रावण, भाद्रपद, पितृ पंधरवडा या दिवसांत या भाज्यांना चांगली मागणी असते. चांगला दर मिळतो म्हणून राहुल या तरुणाने दोडका व कारले यांचे उत्पन्न घ्यायाचे ठरविले. शहरातील जमिनीत वेगळा प्रयोग राबविण्यासाठी त्याला कसबा येथील सिद्धिविनायक अ‍ॅग्रोचे अभिजीत येवले यांचे मार्गदर्शन झाले. कुटुंबीयांची त्यांना मोलाची साथ असते. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राहुल सांगतात.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे