शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:09 IST

वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्वाधिक चर्चेत असणा-या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले.

वाघोली : वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्वाधिक चर्चेत असणा-या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. माजी सभापती व वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अवघ्या ५० मतांनी उबाळे विजयी झाल्या आहेत. पहिल्या ३ वॉर्डांमध्ये वसुंधरा उबाळे या आघाडीवर होत्या. मात्र, स्वत: त्यांनी सर्वच वार्डांमध्ये आघाडी घेतली, तरीही ५० मतांच्या फरकाने आघाडीवर होत्या.ग्रामविकास पॅनलने मतमोजणीवर आक्षेप घेऊन फेरमतमोजणीची मागणी केली होती. फेरमतमोजणीमध्ये वसुंधरा उबाळेच आघाडीवर राहिल्या. वाघेश्वर पॅनलचा सरपंच निवडून आला असला, तरी १७ सदस्यांपैकी वाघेश्वर पॅनलचे ७ सदस्य निवडून आले आहेत, तर ग्रामविकास पॅनलच्या १७ सदस्यांपैकी ९ सदस्य निवडून आले आहेत, तर वॉर्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती जागेवर निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार श्रीकांत वाघमारे निवडून आले आहेत.पुणे येथील शिवाजीनगर शासकीय गोदामामध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रथम फेरीमध्ये वॉर्ड क्र. १, २ व ३ यांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड क्र. ४, ५ व ६ या वॉर्डांची मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या मतमोजणीत उबाळे याच आघाडीवर राहिल्या. दोन्ही फेºयांच्या एकूण मतमोजणीत वसुंधरा उबाळे यांना ८,७६६, मीनाकाकी सातव यांना ८,७१६, साधना व्यवहारे यांना ३३६ व नोटाला १६० मते पडली. उबाळे ५० मतांनी विजयी झाल्या.सदस्यपदासाठी झालेल्या मतमोजणीमध्ये वाघेश्वर पॅनलचे वॉर्ड क्र. १ मधील उमेदवार महेंद्र भाडळे २,५६७, पूजा भाडळे २,९००, शिवदास उबाळे २,५०३, वॉर्ड क्र. २ मधील विजय भाडळे १,३१६, वंदना दाभाडे १,३८१, ग्रामविकास पॅनलचे वॉर्ड क्र. ३चे रामकृष्ण सातव २,०२६, रोहिणी गोरे २,२१४, रेश्मा पाचारणे २,०९२, वार्ड क्र. ४ सुनीता सातव १,६४३, कविता दळवी १,५३०, श्रीकांत वाघमारे १,१८९, वॉर्ड क्र. ५ मधील अर्चना कटके १,३५०, जयप्रकाश सातव १,१८५ हे विजयी झाले. वॉर्ड क्र. ५ मधील मारुती गाडे १,४४८, वॉर्ड क्र. ६ मधील संदीप सातव २,१६०, मालती गोगावले २,२७३, जयश्री काळे १,९८१ या विजयी झाल्या. काळभैरवनाथ पॅनलला एकाही जागेवर यश मिळाले नाही.>निकालाआधीच फ्लेक्सअति उत्साही होऊन वाघोली ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार मीनाकाकी सातव यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागायच्या अगोदरच सकाळी ६ वाजता वाघोलीमध्ये मोठमोठाले सरपंचपदाचे फ्लेक्स लावण्यात आले. त्यामुळे वाघोलीतील ग्रामस्थामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मतमोजणीच्या ठिकाणीच ५० मतांनी विजयी झाल्याचे कळताक्षणी वसुंधरा उबाळे यांना आंनदाश्रू अनावर झाले.