शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेघमल्हारद्वारे वरुणराजाला साद; बासरीच्या साह्याने राग गाऊन पाऊस पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:32 IST

प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत.

- चंद्रकांत साळुंके काऱ्हाटी : प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत. मात्र, ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाही. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत.रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का, याबाबत जिरायती भागात चर्चा रंगली असून हा प्रयोग औत्सुक्याचा ठरत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पाडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. काºहाटी येथे २७ आॅक्टोबरपासून दुष्काळावर मात करण्यासाठी कºहाड येथील इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पाडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. त्याचअनुषंगाने या भागात सलग पाच वर्षांनी दुष्काळ असणाऱ्या भागाला पावसापासून दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बासरीद्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग ७ दिवस वाजविण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास दहा ते बारा स्पीकर लावण्यात आले आहेत. दिवस-रात्र बासरी वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काºहाटीजवळील साळुंकी मंदिराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवस रात्र बासरी वाजवून या परिसराला मंत्रमुग्ध केले आहे. सध्या बासरी वाजवून पाऊस पडतो, या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरीवादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक ठिकाणांहून येथे भेट देत आहेत....तर अशा प्रयोगाची गरज भासणार नाहीबासरी वाजून पाऊस पडतोच. या ठिकाणीसुद्धा पाऊस पडेल. मात्र, सध्याचे वातावरण पाहता पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांनी सांगितले. मात्र, या भागांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात अशा प्रयोगाचीदेखील गरज भासणार नाही. झाडांचे रक्षण केल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी मला खात्री असल्याचे रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग येथे प्रथमच राबविण्यात येत आहे. यापूर्वी विमानाद्वारे आकाशात रसायने सोडून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग तालुक्यात राबविण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याचे केंद्रस्थान बारामतीत होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग बारामतीमध्ये राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग होत आहे. गेल्या ६ वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिरायती भाग तहानलेला आहे. या पार्श्वभूमीवर बासरीवादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊस