शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

इंदापूरच्या तरुणांना मिळणार विविध प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:43 IST

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती : कौशल्यविकासाचे ४५ कोर्स चालू

इंदापूर : सध्याचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्यविकासावर आधारित कोर्स सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला दर वर्षी एकूण पाच कौशल्य कोर्स करता येतील, तर प्रथमवर्ष ते पदवीपर्यंत तीन कोर्स विद्यार्थ्याला करता येतील. मोबाईल दुरुस्ती, हस्ताक्षर, वेब डिझायनिंग, एम. एस. आॅफिस, स्नेक हँडलिंग अँड अवेअरनेस, लँग्वेज बेसिक, मोडी लिपी, प्रॅक्टिकल नॉलेजे आॅफ अ‍ॅग्रिकल्चर, माकेर्टिंग, प्रॅक्टिकल नॉलेज आॅफ बँकिंग, ग्रामीण विकासातील शासकीय धोरणांची माहिती, बर्ड डायव्हर्सिटी, फोटो शॉप, लॅबरोटरी सायन्स, जी.एस.टी., माती परीक्षण, ब्यूटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, योगा आणि फिटनेस यासारखे ४६ कोर्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, संचालक विलासराव वाघमोडे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे, डॉ. सुधाकर जाधवर आदी उपस्थित होते.यांतील 30 कोर्स शंकररावजी पाटील ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयाने पाच वर्षांसाठी करार केला असून, विद्यार्थ्यांना दर वर्षी यातील एक कोर्स करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची माहिती मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणे