शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डे विशेष : ६८ जणांनी उतारवयात सुरू केली नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 11:55 IST

व्हॅलेंटाइन डे विशेष : ‘लिव्ह इन रिलेशन’मधून गवसलं प्रेम

नम्रता फडणीस पुणे : अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी हे दोघेही ज्येष्ठ नागरिक. अनिल हे व्यावसायिक, तर आसावरी या ‘एलआयसी’तून निवृत्त झालेल्या. ‘लिव्ह इन रिलेशन मंडळा’च्या एका सहलीदरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांना नियमित भेटू लागले. एकमेकांचा स्वभाव त्यांना आवडला. दोघांच्या मुलींनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या सात वर्षांपासून दोघे आनंदाने ‘लिव्ह इन’मध्ये राहात आहेत. हे झाले एक प्रातिनिधिक उदाहरण... !                                                                             आज पुण्यातील काही ज्येष्ठांना ‘लिव्ह इन’ हा ‘प्रेमा’चा नवा मार्ग सापडलाय. जीवनसाथीच्या अकाली ‘एक्झिट’नंतर त्यांनी आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. पुण्यात सध्या ६८ ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, अनेकांनी लग्नगाठदेखील बांधली आहे. तरुणाईबरोबरच ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी ही ज्येष्ठ जोडपीदेखील प्रेमाचा दिवस साजरा करणार आहेत.  

सुरुवातीला आम्ही ज्येष्ठांना जोडीदार कशासाठी हवा आहे, हे जाणून घेतो. ज्येष्ठ म्हटले की त्यांच्यात रिजीडनेस खूप आलेला असतो, किंवा महिला भूतकाळात रमत असतात. पुरुषांकडे पैसा कितीही असला तरी खर्च हाेऊ न देण्याची चिवट वृत्ती असते. त्यामुळे पुढे समस्या वाढू शकतात. याबाबत त्यांचे समुपदेशन केले जाते. आमच्या मंडळाचे एक सदस्य हे सांगली इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य. ते भिन्न जातीचे. ती पक्की शाकाहारी आणि ते आहेत मांसाहारी. पण, त्यांची पक्की जोडी जमली आहे. याप्रकारे गेल्या अकरा वर्षांत  ६८ जोड्या ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील ७० टक्के ज्येष्ठांनी लग्न केले आहे.- माधव दामले, संस्थापक, हॅपी सिनिअर्स मंडळ

उतारवयात खऱ्या अर्थानं गरज असताना अचानक कुणीतरी एकाला सोडून जगाचा निरोप घेते. त्यानंतर मग दुसऱ्याला जाणवू लागतो एकटेपणा. ज्येष्ठ नागरिकांची हीच गरज लक्षात घेऊन पुण्यात २०१२ साली ज्येष्ठ नागरिक ‘लिव्ह इन मंडळा’ची स्थापना झाली. सुरुवातीला नावाला विरोध झाला. त्यामुळे नाव बदलून  ‘हॅपी सिनिअर्स’ असे करण्यात आले. 

हे बंध प्रेमाचे... नात्यात गुंफलेले...

सुखाच्या सरींत आणि दु:खाच्या झळांतही सोबत कायम राहणं म्हणजे प्रेम असतं... आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांच्या साथीत सुख-दु:खाची शिदोरी शेअर करत असलेलं हे अकोल्यातील वृद्ध जोडपं पाहिलं की अशा खऱ्या प्रेमाची साक्ष पटते. (छाया : प्रवीण ठाकरे)

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट