शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैभवच्या बहादुरीमुळे मुस्कानचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:47 IST

जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची

राजुरी : जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.येडगाव धरणातून कुकडी नदीला, तसेच कुकडी डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे. हा कुकडी डावा बोरी बुद्रुक जाधववाडीमार्गे गेलेला आहे. जाधववाडी (ता. जुन्नर) गावाची श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय ही शाळा कालव्याच्या बाजूला असून येथील शाळेत शिकत असलेली इयत्ता पाचवीमधील मुस्कान बशीर पठाण ही सायकलवरून शाळेत जात होती. तिचे घर कॅनॉलच्या एका बाजूला असून दुसºया बाजूला शाळा आहे. मुस्कान पुलावरून जात असताना तिचा तोल गेला व या पुलाला कठडे नसल्याने ती पाण्यात पडली.ती जेव्हा सायकलसह पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर काही विद्यार्थी शाळेत चालले होते. त्यांच्यापैैकी इयत्ता आठवीत शिकणारा वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारली व ही वाहत जात असलेली मुलगी जवळपास शंभर मीटरवर गेलेली असतानादेखील तिचा पाण्यात पोहत जाऊन तिला पकडले. पुढे पोहत जाऊन कॅनॉलमध्ये शेतकºयांनी टाकलेल्या पाइपलाइनला पकडून बाहेर काढले.विशेष म्हणजे ही मुलगी जेव्हा पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्याने आरडाओरडा केला होता. आरडाओरड झाल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ घटनास्थळी आले होते. परंतु मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तिला वाचवण्यासाठी कोणीही उडी मारली नव्हती. परंतु या चौदावर्षीय मुलाने कुठलाही विचार न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला व सायकल व तिचे दप्तर वाहून गेले.मुख्याध्यापक एस. ए. कसाळ, तसेच राजेंद्र पायमोडे, रामदास जाधव, अविनाश गायकवाड, किशोर गायकवाड, संतोष जाधव, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या बहादूर विद्यार्थ्याचा सत्कार केला. मुलाचा राज्यपातळीवर सत्कार व्हावा, यासाठी विद्यालयाच्या वतीने पाठपुरावा करणार आहे, असे मुख्याध्यापक एस. ए. कुसाळ यांनी सांगितले.