शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आज ९० लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:12 IST

पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेला मंगळवारी दुपारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा झाल्याने, आज (बुधवार) शहरातील ९० लसीकरण केंद्रांवर ...

पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेला मंगळवारी दुपारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा झाल्याने, आज (बुधवार) शहरातील ९० लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ तर १४ ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ तर २० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील हेल्थ केअर वर्कर, फ्र ंट लाईन वर्कर यांना लसीकरण केंद्रावर आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़

तसेच २० टक्के लस ही ४५ वर्षांवरील नागरिकांना की ज्यांनी ८४ दिवसांपूर्वी ( दि. २ मार्चपूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे़

------------------

आॅनलाईन स्लॉट सकाळी आठ वाजता खुलणार

वय वर्षे ४५ वरील नागरिकांना पहिला डोस घेण्यासाठी आॅनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ प्रत्येक केंद्राला महापालिकेकडून १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत़

---------------

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी २८ एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना बुधवारी (दि. २६) दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ कमला नेहरू रूग्णालय, राजीव गांधी रूग्णालय, सुतार दवाखाना यांसह १४ ठिकाणी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़

------------------------