शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

पुणे : देशभरात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण ...

पुणे : देशभरात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर ३५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील ६७ टक्के जणांना पहिला डोस तर ६ टक्के जणांना दुसरा डोस दिला आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण समांतररीत्या सुरु आहे. सुरुवातील कोविन अ‍ॅपमधील गोंधळामुळे लसीकरण अत्यंत संथ गतीने सुरु होते. सध्या दिवसाला सरासरी ११-१२ हजार जणांना लस दिली जात आहे. लसीकरणाची गती दुपटीने वाढवण्याची अपेक्षा वैैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८९,९७३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३१,३६३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, ५९,६९६ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३६५३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचे सरासरी प्रमाण ७१ टक्के इतके आहे.

राज्यात मुंबईमध्ये आतापर्यंत ५,५९,१२८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ३,३२,९०५ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. देशात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची संख्या साधारणपणे ३० कोटी इतकी आहे. त्यापैैकी केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. ९० टक्के नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. पुढील महिन्याभरात हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर ४५-५९ वयोगटातील कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे लागेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

पुणे जिल्हा लसीकरण आकडेवारी -

पुणे ग्रामीण पुणे शहर पिंपरी चिंचवड एकूण

पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस

सहव्याधी ५१६१ ० ११,७७० ० २७९५ ० १९,७२६

ज्येष्ठ नागरिक २९,४९१ ० ६९,३९१ ० २५,८३३ ० १,२४,७१५

अत्यावश्यक कर्मचारी २४,७७८ २२९६ २५,६६८ ५०१ ९२५० ८५६ ६३,३४९

आरोग्य कर्मचारी ३३,९७२ १२८५८ ३९,९५४ ११,४१० १६,०४७ ७०९५ १,२१,३३६

एकूण ९३,४०२ १५,१५४ १,४६,७८३ ११,९११ ५३,९२५ ७९५१ ३,२९,१२६