शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महापौर साहेब आम्हालाही लस द्या, खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 19:04 IST

शिक्षकांच्या वतीने नगरसेवक आदित्य माळवे यांचे महापौरांना पत्र

ठळक मुद्देमहानगरपालिका शिक्षकांसमवेत खासगी शाळेतील शिक्षकांनाही मिळावी लस

पुणे: पुणे शहरात लसीकरण सुरू झाल्यावर पहिल्या दोन टप्प्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या आरोग्य - महानगरपालिका कर्मचारी, कचरावेचक अशा सर्वांना प्राधान्य देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आम्हालाही लस द्या अशी मागणी खासगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केली आहे. पुणे महापालिकेचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी शिक्षकांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत पत्र दिले. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याचबरोबर लसीकरण प्रक्रियेलाही जोरदार सुरुवात झाली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता खंबीरपणे उभे राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत लसीकरण प्रक्रियेचा तिसरा टप्पा चालू आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा वयाने जास्त व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण चालू आहे. 

महापालिका शाळेतील शिक्षकांनाही लस देण्यात आली होती. मात्र खासगी शिक्षण संस्थेचा याबाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना लवकरात लवकर कोव्हिडं लस उपलब्ध करून द्यावी. अशी विनंती महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर