शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मार्केटिंग’साठी होतोय भिकाऱ्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 02:01 IST

प्रस्थापित समाज आणि बदलत्या विकासाच्या प्रवाहापासून बºयाच अंतरावर उभ्या असलेल्या गरिबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो.

युगंधर ताजणे

पुणे : जिथे दोनवेळच्या भाकरीची भ्रांत अशावेळी कुणी हातावर शंभर किंवा दोनशे रुपयांची नोट ठेवली तर आनंदाने तो सांगेल ते काम केले जाते. न बोलणाºयाचे सोनेही विकले जात नाही, तर दुसरीकडे बोलणाºयाची मातीही विकली जाते. या उक्तीनुसार सध्याच्या ‘मार्केटिंग’च्या जमान्यात प्रत्येकाचा निभाव लागणे कठीण आहे. आता तर आपल्या एखाद्या वस्तुची, उत्पादनाची इतकेच नव्हे तर नव्याने सुरुवात करीत असलेल्या कंपनीच्या ‘जाहिराती’करिता रस्त्यावरील भिकाºयांचा आधार घेतला जात आहे.

प्रस्थापित समाज आणि बदलत्या विकासाच्या प्रवाहापासून बºयाच अंतरावर उभ्या असलेल्या गरिबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो. रस्त्यावर भीक मागणे, एखाद्या सणावाराला खासकरून दिवाळी, नाताळ, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी हातात झेंडे घेऊन सिग्नलवर चारचाकी गाडीच्या खिडक्यांवर ती लहान मुले लक्ष वेधून घेतात. मोठ्या व्यक्ती गजरे, टिश्यूपेपर, फुगे, अंकलिपी, खेळणी या वस्तु विकण्याकरिता गाडीच्या मागे पुढे करताना दिसतात. दिवसभरातून मोजकीच कमाई हाती येणाºया या व्यक्तींपुढे रात्री जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यात त्या लहान मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या या परिस्थितीचा उपयोग विविध कंपन्यांच्या मार्केटिंगमधील व्यक्तींनी करून घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप, एफ. सी. रस्ता, प्रभात, बाजीराव रस्त्यांवरील भिकाºयांचा खासकरून लहान मुलांचा आपल्या उत्पादनांची, वस्तुंची जाहिरात करण्याकरिता उपयोग करून घेतला जात आहे. यात काही वेळा उत्पादनाविषयी माहिती देणाºया पॅम्प्लेटस वाटणे, तर कधी पोस्टर्स चिकटवणे यांसारखी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. इतकेच नव्हे, तर व्हिजिटिंग कार्ड वाटण्याचे कामदेखील काही लहान मुलांना दिले जात आहे. त्यांना खाऊ-पिऊ घालून किंवा खिशात शंभर-दोनशेची नोट टाकून मोठ्या खुबीने त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे. बाजारात पॅम्प्लेट वाटणे, भित्तीपत्रके चिकटविणे, व्हिजिटिंग कार्ड किंवा उत्पादनविषयक माहितीपत्रके वाटणाºयांचे ‘फिक्स रेट’ ठरले असताना दुसरीकडे या रस्त्यावरील भिकाºयांकडून स्वस्तात काम करून घेतले जात आहे.पैसा मिळाला हे महत्त्वाचे४डेक्क्नच्या पुलावर भिकारी असणाºया रतनला याविषयी विचारले असता तो म्हणाला, नाही तरी दिवसभर फारसे काम असते कुठे? तेव्हा एकवेळ कमी पैसे मिळाले तरी जेवणाचा प्रश्न सुटतो.४आपण एकटे नसतो आपल्याबरोबर रस्त्यावर झोपणारे कुटुंबदेखील आहे. त्यांनाही खाऊ घालावे लागते. हे खरे की, कमी पैशांत जास्त काम करून घेतले जाते. पण मी त्या कामाला नाही म्हटलो तर दुसरा कुणी ते करण्याकरिता उभा राहतो. अशा वेळी शांतपणे राहणे जिवावर येते.मार्केटिंगचा वेगळा फंडा...४बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, एखाद्या प्रसंगी चहाच्या टपरीवर लहान मुलांच्या हातात हमखास वेगवेगळ्या रंगाची, आकाराची माहितीपत्रके दिसतात. ते ती वाटतात किंवा भिंतीवर चिकटवतात. दिसेल त्याच्या हातात ते माहितीपत्रक देतात. त्यांच्या खिशात व्हिजिटिंग कार्डचा गठ्ठा असतो. चहा पिण्याकरिता आलेल्या व्यक्तींना ती वाटली जातात.४एकीकडे शहरातील अनेक सामाजिक संस्था भिकारी मुलांचे जीवनमान सुधारण्याकरिता प्रयत्नशील असताना दुसºया बाजूला कमी मोबदला देऊन त्यांच्याकडून ‘मार्केटिंग’चे काम करवून घेतले जाते.

टॅग्स :Puneपुणे