--
ऊरुळी कांचन : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या ११ महिन्यांपासून बंद असलेला ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील आठवडा बाजार रविवारी (ता. १४) सुरू झाला आहे. बाजार सुरू झाल्याने शेतकरी, व्यापारी, लहान मोठे दुकानदार व खरेदीदारांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याने प्रतिकिलोला ५० ते ६० रुपये भाव खाल्ला आहे.
अवकाळी पावसामुळे यंदा नगदी पिकांच्या शेतीला मोठा फटका बसला. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले. अशात उन्हाळी कांद्याचा साठा संपत आला असून, नवीन पीक पुरेशा प्रमाणात आलेले नाही. यामुळे सर्वत्र कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.
बाजारात फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, काही भाज्यांची मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने फ्लॉवर, कोबी, शेवगा, गाजर, बीट, स्वस्त आहे, तर वांगी प्रतिकिलो ४० रुपये, कारले ४०, टोमॅटो २०, काकडी २०, बटाटा २० ते २५, वाटाणा ३०, तर कोबी १० रुपये किलो, तर फ्लॉवर पाच रुपयांपासून ते १० रुपये किलोप्रमाणे मिळत होते. तेजीत असलेल्या पालेभाज्यांचे दर स्थिर होते.
--
चौकट
--
कोरोनाच्या प्रादुर्भावाणे हॉटेल व्यवसाय, चायनीज स्टौल, व हातगाड्या बंद आहेत, त्यामुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेले कोबीचे भाव घसरले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपला कोबी अक्षरश: आठवडे बाजरामध्ये फेकून दिला. भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
लॉकडाउन होण्याआधी हवेली तालुक्यातील सर्वच ठिकाणी आठवडी बाजार करून उपजिविका चालवीत होते. आठवडी बाजार बंद झाल्यापासून बेकारी झाली होती, आज आठवडे बाजार सुरू झाल्याने समाधान वाटले. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत विकते असे सिंधूताई रायकर यांनी सांगितले.
--
कोट -२मागील तीस वर्षापासून तंबाकू, सुपारी, पान विकत आहे, हवेली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ऊरुळी कांचन येथील बाजार सुरू झाल्याने आनंद झाला आहे. पापाभाई तांबोळी, तंबाखू, सुपारी विक्रेते.
--
फोटो क्रमाक -१५ उरुळी काचन बाजार सुरु
फोटो ओळ :- ऊरुळी कांचन (ता. हवेली ) येथे रविवारी सुरू केलेल्या आठवडी बाजारात विक्रेत्यांची झालेली गर्दी