शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी नाट्यसंमेलन ‘नागपूर’ला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:20 IST

पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते.

- नम्रता फडणीस पुणे : आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे. परंतु लातूरमधील दुष्काळाची स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी यांच्या ‘नागपूर’लाच संंमेलन होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे ‘नागपूर’ वरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षीपासून शासनाने नाट्यसंमेलनासाठीदेखील ५० लाख रुपयांची तरतूद केल्यामुळे अनेक इच्छुक संस्था व शाखा आयोजनासाठी पुढे सरसावल्या. राज्यभरातून संंमेलनाच्या आयोजनासाठी तब्बल नऊ निमंत्रणे आल्याने नाट्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या स्थळांची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली. परंतु स्थळांचा दौरा करण्यापूर्वीच सात संस्था आणि शाखांनी आपले प्रस्ताव मागे घेतले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आगामी वर्षात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार असल्याने कदाचित आयोजनापुढे अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो, अशी शक्यता वाटल्याने इच्छुक संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतले असावेत, असा अंदाज आहे. लातूरकर आणि नागपूरकर दोघांनाही संमेलन आयोजिण्याची इच्छा आहे. मात्र लातूरमधील दुष्काळाच्या परिस्थितीचाही विचार करावा लागणार आहे. संमेलनाचा दर्जा आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. ‘नागपूर’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी दोघांचीही मायभूमी असल्याने निवडणुकीच्या काळातही या ठिकाणी संमेलन उत्तम प्रकारे होऊ शकते, असे वाटते. त्यामुळे हेच स्थळ आयोजनासाठी अधिक सोयीचे आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत लातूर किंवा नागपूर या दोन स्थळांपैकी एकावर शिक्कामोर्तब केले जाईल, तसेच एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने नाट्यसंमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार डॉ. प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्यानंतर हे संंमेलन कुठे आणि कधी होणार, याकडे समस्त नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या डामडौल आणि भव्यतेमुळे काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या नाट्यसंमेलनाला चांगले दिवस आल्याची चर्चा ऐकायला मिळाली.