शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कलांचा मिलाफ अवर्णनीय

By admin | Updated: April 29, 2017 04:22 IST

कलेचे सादरीकरण हा कलाकाराचा आत्माविष्कार असतो. प्रत्येक कलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. कलावंत कलांमधील सीमारेषा पुसून टाकतो.

पुणे : कलेचे सादरीकरण हा कलाकाराचा आत्माविष्कार असतो. प्रत्येक कलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. कलावंत कलांमधील सीमारेषा पुसून टाकतो. सध्याचे प्रेक्षकही अभिजात कलांबाबत जाणकार होत आहेत. कथक नृत्याचा आनंद घेणारे रसिक आणि लावणीला दाद देणारे रसिक यांच्यामुळेच कलांना अधिष्ठान प्राप्त झाले. विविध नृत्यकलांचा हा मिलाफ अवर्णनीय आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी काढले.लोकरंग सांस्कृतिक मंच आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ढेरे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट निर्माते मिलिंद लेले उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पवार यांना परांजपे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. शकुंतला नगरकर यांच्या वतीने त्यांची कन्या श्रद्धा काळे यांनी पुरस्कार स्वीकारला.मिलिंद लेले म्हणाले, ‘विविध कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेताना गुण वाढवून मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, गुणपत्रिकेवर कलेचे नाव नमूद केले जाणार आहे. लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. त्याआधी, लोककलेचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुण वाढवून मिळणार आहेत.’ मनीषा साठे म्हणाल्या, ‘अभिजन आणि बहुजनांची कला अशी विभागणी करताच येणार नाही. कला सर्वजणांच्या हृदयाला भिडणारी असते.जाणकार आणि सामान्यजनांना आनंद देते तीच खरी कला. लोककला, शास्त्रीय नृत्यकलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. परंपरेची कास धरत कलेची साधना करत राहिल्यास ध्येय निश्चितपणे साध्य होते.’ शैला खांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश खांडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)