शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विवाहेच्छूंना अवैध बांधकामांचा ‘मंगळ’

By admin | Updated: February 11, 2015 01:04 IST

विवाह जुळविण्याच्या वेळी कांदेपोहे कार्यक्रम सुरू असताना, काही औपचारिक प्रश्न विचारण्याची पद्धत रूढ आहे. मुलाला नोकरी,

संजय माने, पिंपरीविवाह जुळविण्याच्या वेळी कांदेपोहे कार्यक्रम सुरू असताना, काही औपचारिक प्रश्न विचारण्याची पद्धत रूढ आहे. मुलाला नोकरी, व्यवसायाबाबतची चौकशी केली जाते. मुलगी असेल तर तिची आवड-निवड विचारली जाते... मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये अलीकडच्या काळात घर स्वत:चे आहे; परंतु ते अधिकृत आहे का? याची खास चौकशी, विचारणा होऊ लागल्याने अनधिकृत बांधकाम ही बाब पिंपरी-चिंचवडमधील विवाहेच्छुकांचा विवाह जुळविण्यात मोठी अडचण ठरू लागली आहे. दुमजली-तीनमजली इमारत पाहून ‘पार्टी’ मालदार, सधन आहे, अशी समजूत विवाहाच्या निमित्ताने मुलगा वा मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या मंडळीची होत असे. घर आणि सांपत्तिक स्थिती विचारात घेऊनच विवाह जुळविण्यास प्राधान्य दिले जाते. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अशा मोठ्या इमारती, रो हाऊस बांधलेले दिसले, तरी ते अधिकृत असेल की नाही, अशी शंका विवाह जुळविणाऱ्यांच्या मनात निर्माण होते. मनात निर्माण झालेले हे शकांचे काहूर ‘कांदेपोहे’ कार्यक्रमावेळी बाहेर पडते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आवड-निवड, पत्रिका जुळणे, अनुरूपता यासंबंधीचे प्रश्न विचारले जातातच, शिवाय घर स्वत:चे आहे, पण बांधकाम ‘रेडझोन’मध्ये तर येत नाही ना, परिसरात जवळच नदी अथवा ओढा दिसून आल्यास घराचे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत तर येत नाही ना, महापालिकेची कारवाईबाबतची नोटीस आली आहे का, असे प्रश्न हमखास विचारले जातात. वाहनतळापासून ते गच्चीपर्यंत फेरफटका मारल्यानंतर कागदपत्रे पाहण्याची इच्छा जरी व्यक्त केली नाही, तरी घर अधिकृत आहे, की अनधिकृत हे विचारण्याचे धाडस आवर्जून दाखवले जाते. कारण ज्या घरात मुलगी द्यायची ते घर अनधिकृत असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. पुढील काळात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही, हा विचार त्यांच्या मनाला अस्वस्थ करतो. अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत विविध भागातील मोठ्या इमारतींची बांधकामे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. भूईसपाट झाली. त्यामुळे उघड्यावर पडलेले संसार, हक्काचे घर गेल्यामुळे नागरिकांचा झालेला आक्रोश ही दृश्ये पाहिल्याने मुला-मुलीचे भवितव्य घडविताना वरकरणी दिसणाऱ्या, भुरळ पाडणाऱ्या सांपत्तिक स्थितीपेक्षा त्या मालमत्तेच्यावैधानिक स्थितीला महत्त्व दिले जात आहे. ही परिस्थिती देशात, राज्यात कोठेही नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र या कटू अनुभवातून अनेकांना जावे लागत आहे. गेल्या वर्षी थेरगाव परिसरात आदल्या दिवशी विवाहसोहळा झाला आणि दुसऱ्याच दिवशी दारातील मंडप सोडण्यापूर्वीच वधुपक्षाच्या घरावर अतिक्रमणविरोधी पथकाचा हातोडा पडला.