पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्या संशोधन प्रकल्पातील संशोधक बापूराव घुंगरगावकर यांना शांताबाई बनकर यांनी १९३९ मध्ये लिहिलेल्या ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ या पुस्तकाची प्रत मिळाली आहे. हे सावित्रीबाई फुले यांचे पहिले उपलब्ध चरित्र आहे. या पुस्तकाबरोबरच ‘बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ’ आणि ‘शेतक-याचा असूड’ या आणखी २ पुस्तकांचे प्रकाशन रविवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. हे प्रकाशन सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक डॉ. बाबा आढाव, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि उत्तमराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
-------------
विद्यापीठाने पुनर्प्रकाशित केलेली पुस्तके हा सामाजिक ठेवा आहे. या प्रकाशनाच्या माध्यमातून माफक दरात अनेक चांगली व दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देणे हे मी विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने माझे कर्तव्य समजतो.
- प्रा. डॉ. नितीन करमळकर,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ