शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ: क्रेडिट सिस्टीममध्ये बदल : आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 06:29 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार असून त्यातील सध्य स्थितीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदलांसह नव्याने क्रेडिट सिस्टीम राबविली जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार असून त्यातील सध्य स्थितीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदलांसह नव्याने क्रेडिट सिस्टीम राबविली जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशानुसार देशातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रेडिट सिस्टीम राबविली जात आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राबविल्या जाणाºया क्रेडिट सिस्टीममध्ये आणि इतर विद्यापीठांमधील क्रेडिट सिस्टीममध्ये काही प्रमाणात तफावत असल्याचा अहवाल प्रा. एस. एस. घासकडबी यांनी विद्यापीठाला सादर केला. त्यात पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १०० क्रेडिट, तर इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ८० क्रेडिट घ्यावे लागत असल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडून विद्यापीठातील विभागांमध्ये आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणा-या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार आहे.सायन्स व सोशल सायन्स यातील क्रेडिटमध्ये काही प्रमाणात तफावत आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना निवडलेल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करण्यास अवधी मिळत नाही. तसेच प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक कालावधी मिळत नाही. या समितीकडून क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड व प्रा. एस. एस. घासकडबी यांच्यासह आणखी एक सदस्य असलेल्या समितीकडे या संदर्भातील अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात या समितीकडून अहवाल विद्यापीठाला सादर करण्याची शक्यता आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने क्रेडिट सिस्टीमबाबत काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना अधिकचे १० क्रेडिट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांवर ताण येऊ नये. या उद्देशाने सद्य:स्थितीतील क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जात आहे. तसेच शैक्षणिक दर्जा कायम ठेवत क्रेडिट सिस्टीममध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.- डॉ. एन. एस. उमराणी,प्र-कुलगुरू, सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ