शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगीत जखमी दोघाही भावांचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:11 IST

कोरेगाव भीमा : येथील मुख्य चौकात असलेल्या आगरवाल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी (दि. ८) लागलेली आग विझवताना सतीश व संतोष आगरवाल दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते.

कोरेगाव भीमा : येथील मुख्य चौकात असलेल्या आगरवाल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी (दि. ८) लागलेली आग विझवताना सतीश व संतोष आगरवाल दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते. आठ दिवसांपूर्वी सतीश आगरवाल यांचे निधन झाले होते. शनिवारी (दि. १८) सायंकाळी संतोष लखीराम आगरवाल यांचेही निधन झाले. दोघा सख्ख्या भावांचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याने परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.आग लागल्याचे समजताच आगरवाल बंधूंनी दुकानाकडे धाव घेतली असता दुकानाचे शटर उघडताच आग शटरमधून बाहेर आल्याने आगीच्या लोळात भाजून दोघे जखमी झाले होते. दोघांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठीदाखल करण्यात आले होते. त्यातील सतीश आगरवाल यांचे गेल्या शनिवारी (दि. ११) निधन झाले होते. त्यानंतर आठच दिवसांत संतोष यांचे निधन झाले.दोघांच्या निधनामुळे कोरेगाव भीमा येथील व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. आज दुपारी भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर भीमा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.सतीश व संतोष आगरवाल सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून केसनंद येथील जोगेश्वरीच्या डोंगरावर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. तसेच गावातील पाणपोई, माणुसकीची भिंत उपक्रम तसेच फिल्टर पाणपोई सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. संतोष आगरवाल यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू