शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत महापालिकेकडून ३,५०० परवडणारी घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:24 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत शहरातील विविध भागात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीने ३ हजार ४४५ घरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, हा अहवाल म्हाडाकडे दाखल केला आहे.

पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत शहरातील विविध भागात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीने ३ हजार ४४५ घरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, हा अहवाल म्हाडाकडे दाखल केला आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत योजनेअतंर्गत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी येथे सांगितले.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये आठ जागा पालिकेने निश्चित केल्या आहेत. या जागेवर ६१ इमारती बांधल्या जाणार असून त्यामध्ये ६ हजार ३२४ सदनिका बांधल्या जाणार आहेत. याचा डीपीआर पालिकेने राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यातील काही डीपीआरमध्ये आक्षेप काढण्यात आला असून ३ हजार ४४५ घरांचा डीपीआर मान्य करण्यात आल्याने तो म्हाडाकडे पाठविण्यात आला आहे.प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने परवडणारी घरे ही संकल्पना केंद्र सरकारने मांडली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे देशात कोठेच हक्काचे घर नाही, अशांना या योजनेअंतर्गत हक्काचे घर देण्यात येणार आहे. शहरी भागात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा विभागांत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.परवडणाºया घरांसाठी १ लाख १३ हजार २२८ अर्जमहापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात परवडणाºया घरांचे प्रकल्प उभे करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्या आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत २८ हजार ९०, कर्ज संलग्न व्याज अनुदानासाठी २८ हजार १४८, परवडणाºया घरांसाठी ४१ हजार ७८३ तर वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी अनुदानासाठी १५ हजार २०७ असे सुमारे एक लाख १३ हजार २२८ अर्ज आले आहेत. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका