शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या नावाखाली वृद्धाच्या ATM मधून लाखोंची रक्कम केली लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 10:44 IST

एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएम सेंटरजवळ दोन अनोळखी इसमांची मदत घेतली. मात्र तिच मदत त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरली आली. लोणावळ्यातील ही घटना आहे.

लोणावळा, दि. 7 - एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएम सेंटरजवळ दोन अनोळखी इसमांची मदत घेतली. मात्र तिच मदत त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरली आली. लोणावळ्यातील स्टेट बँकेमधून ग्रीन कॅश काऊंटरचा वापर करत या दोन भामट्यांनी तब्बल 3 लाख 40 हजारांची रोकड व एक्सिस बँकेमधून 14 हजार रुपये काढत पोबारा केला आहे. शनिवारी (5 ऑगस्ट ) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी सुशिल धनकवडे (वय 61 वर्ष) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. धनकवडे हे 31 मे रोजी रेल्वेमधून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना सेवा निवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युटी व फंडाची रक्कम रुपये 13 लाख रुपये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया लोणावळा शाखेत जमा केली होती. यापैकी 10 लाख रुपये त्यांनी पत्नीच्या दुसर्‍या खात्यावर जमा केली होती तर पेन्शनची रक्कम धरुन 3 लाख 68 हजार 439 रुपये त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा होती. 

शनिवारी सकाळी त्यांनी कॅनरा बँकेच्या एटीएम मधून 4 हजार रुपये काढले व स्टेट बँकेच्या एटीएम मधून 10 हजार रुपये काढण्यासाठी एटीएम मध्ये उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. त्या व्यक्तींकडे पैसे काढण्यासाठी कार्ड व एटीएमचा पिन क्रमांक दिला. त्या व्यक्तीने धनकवडे यांना दहा हजार रुपये काढून दिले व सोबत धनकवडे यांच्या कार्ड सारखे दिसणारे दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले. धनकवडे गेल्यानंतर काही वेळांनी त्या कार्डच्या व पिन क्रमांकाच्या सहाय्याने आरोपींनी स्टेट बँक व एक्सिस बँकेच्या एटीएम मधून तब्बल 3 लाख 54 हजार रुपयांची रोकड काढून पोबारा केला आहे. एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीच्या फुटेजमधील त्या दोन अज्ञात चोरट्यांना धनकवडे यांनी ओळखले असून त्या आधारे लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.