शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात

By admin | Updated: January 14, 2017 03:18 IST

बारामती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून

बारामती : बारामती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांच्या शोध पथकाची गस्त सुरु होती. ११ जानेवारीला गस्त सुरु असताना दुपारी ४च्या सुमारास शहरातील गुणवडी चौक येथे ग्लॅमर दुचाकीवर एक संशयित पोलिसांना आढळला. त्याला पोलिसांनी थांबवून विचारपूस केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याला अधिक चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हा संशयित अल्पवयीन युवक आहे. त्याने त्याच्याकडे असलेली दुचाकी शहरातील पाटस रस्ता येथून चोरल्याची कबुली दिली. अल्पवयीन युवकाने त्याचा साथीदार लखण ऊर्फ डड्या नरसिंह भोसले (रा. तांबा, राजोरी,जि. बीड) याच्यासह बारामती, दौंड येथून ११ दुचाकी चोरल्याची क बुली दिली. २ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनील गायकवाड, पोलीस हवालदार अनिल काळे, पोलीस नाईक रमेश केकाण, रुपेश साळुंके, राजेंद्र गायकवाड, ओंकार सिताप, पोपट नाळे, सिद्धेश पाटील, नाथसाहेब जगताप, दादा डोईफोडे यांनी केली. (प्रतिनिधी)