पुणे : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करीत असल्याची घोषणा केली होती. आजच्या काळात हीच परिस्थिती निर्माण झाली असून, देशात अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे. सर्वांना दडपणाखाली ठेवले जात आहे. १९७५ पेक्षाही कठीण संघर्ष करावा लागणार आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले.क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि प्रफुल्लता प्रकाशन यांच्यावतीने युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षीलिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशसमारंभप्रसंगी ते बोलत होते.
देशात अघोषित आणीबाणी - यशवंत सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:51 IST