शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:17 IST

मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे.

बारामती : मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांची ऐसीतैशी करीत बेलगाम वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. याबाबत प्रशासनच ढीम्म असून वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे बारामतीकरांवर ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे.बारामती शहरासह लगतचा भाग, तसेच तालुक्यातील मोठ्या गावांच्या विकासाची गती वाढली आहे. शहराकडे येण्याचा लोकांचा ओढा वेगाने वाढत चालला आहे. परिणामी, शहरातील वाहनांच्या संख्येतही भर पडत चालली आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१२-१३ पर्यंत एकूण २ लाख ३२ हजार २९ वाहनांची नोंदणी झाली होती. मागील पाच वर्षांत त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये या वाहनसंख्येत जवळपास दीड लाख वाहनांची भर पडली आहे. हा आकडा बारामतीसह दौंड व इंदापूर तालुक्यातील वाहनांचा असला तरी बारामती तालुक्यातील वाहनांची संख्या तुलनेने अधिक आहे.एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरुंदच राहिले. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी अनेकदा तात्कालिक उपाययोजना करण्यात आल्या. नगरपालिका, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागासह अन्य संबंधित विभागांकडून त्यावर ठोस उपाय न करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. भविष्यात ही समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.>डबल पार्किंगचे ग्रहणमहावीर पथ, स्टेशन रोड, सिनेमा रोड, गुणवडी चौक ते बसस्थानकापर्यंत या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक रस्त्यांना डबल पार्किंगचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. बहुतेक रस्त्यांलगत दुचाकी उभ्या करतात.त्यांच्यामागे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत आहे.>आरटीओकडील गेल्या तीन वर्षांतील वाहन नोंदणी२०१५-१६२३७८११७८४०२५७४२०१६-१७ २३६६५ १७६३१ ३२१७२०१७-१८ ३२६६७ २४२४८ ३९२५>उपाययोजना शून्यसुरळीत वाहतुकीसाठी काही चौकांमध्ये काही वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. पण सध्या ते बंद आहेत. गर्दीच्यावेळी नियमनासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते. पण वाहनचालक त्यांनाही जुमानत नाहीत.नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. रस्त्याच्याकडेला पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. सर्वच रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले.ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन घुसविणे असे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळाले. अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नाही.>नियमांचे उल्लंघनमहावीर पथ व स्टेशन रस्ता एकत्र येत असलेल्या चौकातून दोन्ही रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. पण वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटली जात असल्याचे पाहायला मिळाले. या चौकात काही वेळा पोलीसही असतात. पण त्यांनाही जुमानले जात नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या हे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूककोंडी नेहमीचीच झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे