शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नीरा रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:56 IST

नीरा : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वे प्रशासनाने पार्किंगची जागा उपलब्ध केली असली तरी अस्ताव्यस्त गाड्या लावल्याने दररोज प्रवाशांमध्ये तू-तू मै-मै होत आहे. रेल्वे प्रवाशांव्यतरिक्त लोक गाड्या पार्किंग करून जात असल्याने नाहक गर्दी वाढत आहे. ...

नीरा : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वे प्रशासनाने पार्किंगची जागा उपलब्ध केली असली तरी अस्ताव्यस्त गाड्या लावल्याने दररोज प्रवाशांमध्ये तू-तू मै-मै होत आहे. रेल्वे प्रवाशांव्यतरिक्त लोक गाड्या पार्किंग करून जात असल्याने नाहक गर्दी वाढत आहे. पार्किंगच्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत.

पुण्याचे उपनगर म्हणून नीरा (ता. पुरंदर) शहराची ओळख होऊ लागली आहे. दररोज सकाळी परिसरातील शेकडो प्रवासी पुणे, मुंबई, सातारासह इतर ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. परिसरासह नीरा शहरातील लोक दुचाकी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात. दिवसभर मोटारसायकल पार्किंगमध्ये लावलेली असते. संध्याकाळी ती घेऊन जातात. परंतु येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली नाही. रेल्वे प्रशासनाने फक्त पार्किंगसाठी जागा निर्माण केली. पण मोटारसायकली रामभरोसे सोडून कामावर जावे लागते. नियमित प्रवासी त्यांच्या मोटारसायकली रांगेत व्यवस्थित लावतात. पण थोड्या वेळासाठी किंवा प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक अस्ताव्यस्त गाड्या लावतात. त्यामुळे गाड्या काढताना कुरबुरी नित्याच्या झाल्या आहेत. नीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी येतात. खाजगी रुग्णालय, बँक, पतसंस्थांसह व्यावसायिकांच्या दारासमोर वाहने चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेली असतात.पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारण्याची मागणीकेवळ आठवडी बाजारात वाहन चालकांवर कारवाई करत किरकोळ १०० रुपयांचा दंड करण्यापेक्षा वाहतुकीत शिस्त यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. धनदांडग्यांच्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने आपसूकच बेशिस्त पार्किंगची समस्या वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाने पार्किंगच्या जागेत योग्य त्या सुविधा देणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी