पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी मुळा-मुठा नदीत पाणी सोडावे किंवा नाही, याबाबत तत्काळ सुस्पष्ट अहवाल देण्याच्या सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे महापालिकेला दिल्या आहेत.राव यांनी सांगितले, ‘‘यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. धरणांच्या साठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. पाण्याची गंभीर टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढला आहे. आगामी पावसाळी हंगामापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही धरणांमधून प्रामुख्याने खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून राहणार आहे. याबाबत विसर्जनासाठी मुळा-मुठेत पाणी सोडण्याबाबत दबाव वाढत आहे. यामुळे पाणी सोडण्यासंदर्भात महापालिकेकडून अहवाल मागविला आहे.’’
पाणी सोडण्यावर अनिश्चितता
By admin | Updated: September 24, 2015 03:13 IST