शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

अनधिकृत बांधकामांचे पेव

By admin | Updated: November 16, 2015 01:55 IST

ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही

राजगुरुनगर : ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे सुरूच असून, या दोन्ही शहरांच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अनधिकृत बांधकामे मोठा अडथळा ठरणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेने अशा सुमारे ४० बांधकामाना नोटिसा बजावल्या असूनही बांधकाम करणारे नोटिसांना न जुमानता बांधकामे करीतच आहेत. पिंपरी-चिंचवडनंतर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये चाकण आणि राजगुरुनगरचा समावेश होतो. विशेषत: चाकण हे औद्योगिक वसाहतीमुळे वेगाने विकसित होत आहे. मात्र गेल्या वर्षीपर्यंत येथे ग्रामपंचायती असल्यामुळे अनधिकृत बांधकामे वेगाने सुरूहोती. त्यामुळे या गावाचे अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद राहिले आहेत. बहुमजली इमारती झाल्या, पण वाहनतळ नसल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्न आहे. परिणामी रस्त्यवर वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यात पथारीवाल्यांची आणि वडापावसारख्या गाड्या लावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत बांधकामांमुळे कचरा, सांडपाणी यांचेही मोठे प्रश्न या गावांमध्ये उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी गटारे नाहीत. असलेली एवढ्या बांधकामांना पुरी पडत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहात असते. पावसाळ्यात तर रस्तेच गटारे होऊन जातात. कचरा उचलणे स्थानिक व्यवस्थापनाला शक्य होत नाही. या अस्ताव्यस्त बांधकामांमुळे वीज, पाणीपुरवठा या व्यवस्थांवर ताण येतो. आगीसारखी घटना घडली तर बंब घुसविताना आणि तो उभा करताना सुद्धा मुश्कील होते.राजगुरुनगरमध्ये गेल्या महिन्यात एक छोटी आग लागली तेव्हा हा अनुभव नागरिकांना आला होता. या समस्या असतांनाही अनधिकृत बांधकामे थांबत नाहीत. त्यांना कोणीही अटकाव करू शकत नाही याची खात्री पटली आहे. गावातले रस्ते अरुंद झाल्याने चाकणला फार पूर्वीच पुणे- नाशिक महामागार्ला बाह्यवळण काढावे लागले. आता राजगुरुनगरलाही याच कारणाने बाह्यवळण होत आहे. (वार्ताहर)