शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:17 IST

मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती.

ठळक मुद्देसोमेश्वरनगर परिसरात याअगोदरही अनधिकृत गॅस एजन्सीवर कारवाईरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोमेश्वरनगर : मुरुम (ता. बारामती) येथील सचिन शंकरराव उगले यांच्या मालकीच्या श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये अनधिकृत असलेल्या सव्वाशेच्यावर घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. बारामती पुरवठा विभाग, गुन्हे शोध आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमवारी (दि. २२) दुपारी संयुक्त कारवाई करत जप्त केल्या. मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर सचिन उगले यांच्या स्वामी समर्थ किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती. या विभागाने बारामती पुरवठा विभागास संपर्क साधून माहिती दिल्यानंतर सोमवारी तालुका पुरवठा अधिकारी संजय स्वामी आणि नायब तहसीलदार महादेव भोसले, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस कर्मचारी अनिल काळे, रविराज कोकरे, उपनिरीक्षक जी. टी. संकपाळ, पोलीस नाईक सचिन वाघ, काशिनाथ नागराळे, तलाठी ए. डी. होळकर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. या ठिकाणी अवैधरीत्या गॅसचा साठा करणे, वाहनांमध्ये गॅस भरून देणे, विविध गॅस एजन्सीच्या टाक्या गोडावूनमध्ये ठेवणे अशी कामे या ठिकाणी होत असल्याची माहिती या विभागाला मिळाली. त्यानंतर धाड टाकत ही कारवाई करण्यात आली.या ठिकाणी सव्वाशेच्यावर टाक्यामध्ये घरगुती वापराच्या, व्यावसायिक वापराच्या, पाच किलो आदी प्रकारच्या टाक्या या कारवाईत हस्तगत करण्यात आल्या. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सोमेश्वरनगर परिसरात याअगोदरही अनधिकृत गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, यात अजूनही बदल झाला नाही. सोमेश्वरनगर येथे अशा प्रकारच्या गॅस एजन्सी सुरू आहेत, यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCylinderगॅस सिलेंडरPoliceपोलिस