लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या उज्जीवन फायनान्शिअल सर्विसेस लि.च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यातील चार शाखांच्या उद्घाटनासह येथील कामकाजाच्या शुभारंभाची घोषणा केली. स्वारगेट, पिंपरी, आकुर्डी व हडपसर येथे या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या स्वारगेट शाखेचे आज उद्घाटन केले. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ समीत घोष म्हणाले, आठ वर्षे आमच्या ग्राहकांना सूक्ष्मवित्त सेवा दिली आहे. नियोजित ग्राहकवर्गाला अधिक सेवा देण्यासाठी आम्ही येत्या काही महिन्यांत देशभरातील आमच्या बँकिंग कामकाजाचा व्याप आणखी वाढवणार आहोत. सीओओ इतिरा डेव्हिस म्हणाले, उज्जीवनमध्ये बँकिंग अधिक सुलभ, सोपी आणि आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणारी असावी, यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. एकूण ३० शाखा असलेल्या उज्जीवन एसएफबीने बंगळुुरू, रामनगर, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. (वा. प्र.)
उज्जीवन बँकेच्या आता पुण्यात शाखा
By admin | Updated: May 10, 2017 04:14 IST