राज
रांजणगाव सांडस : बाभूळसर बु. (ता. शिरूर) सालाबादप्रमाणे बाभूळसर बु. येथील उदनशहा बाबा दर्गा उत्सव दिनांक १९ मार्च २०२१ रोजी होणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. शासनाच्या आदेशानुसार यात्रा, उत्सव, समारंभ, करमणूक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे यावर्षी असणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. फक्त गुरुवार १८ मार्च रोजी विधिवत पूजा संदल मोजक्या लोकांच्या उपस्थित सर्व शासकीय नियम पाळून होईल. आदेशानुसार यात्रा भरविण्यास, मंदिरात प्रवेश, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळा, करमणूकीचे कार्यक्रम, कुस्त्यांचे आखाडे या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
लोकांनी गावात गर्दी करू नये, सर्वानी मास्कचा वापर करावा, स्वच्छता राखावी असे आवाहन बाभूळसर ग्रामपंचायत, यात्रा कमिटी,पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. उदनशहा बाबा दर्गा येथे अजून काही विकासकामे करावयाची आहेत. कलर,लाईट व जागा खरेदी अशी कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता होण्यासाठी आपण सर्वांनी देणगीच्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.