शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

दोन वर्षांच्या मुलाच्या घशात अडकला मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:27 IST

खेळण्यातील लंबगोलाकार मणी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षे वयाच्या मुलाला वाचविण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

पुणे : खेळण्यातील लंबगोलाकार मणी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षे वयाच्या मुलाला वाचविण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. शस्त्रक्रिया करून स्वरयंत्रात अडकलेला हा दीड सेंटिमीटर लांबीचा मणी काढण्यात आला.ससून रुग्णालयात आणले त्या वेळी या मुलाला ठसका लागत होता, तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. या मुलाचे आई-वडील दोघेही अशिक्षित आहेत; त्यामुळे त्यांना नेमके काय होत होते, हे कळाले नाही. मुलगा भात खात असताना त्याला ठसका लागल्याने रुग्णालयात आणल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. हा मुलगा रात्रभर बालरोग विभागात होता. बालरोगतज्ज्ञांनी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांना त्याची तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. शेफाली पवार यांनी सीटी स्कॅन केल्यानंतर श्वासनलिकेत एक लंबगोलाकार मणी अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री ८ वाजता तातडीने ब्राँकोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. माया जामकर व सहकाऱ्यांनी मुलाला तत्परतेने भूल दिली. त्यानंतर डॉ. समीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी मुलाच्या घशातील मणी बाहेर काढला. हा मणी सुमारे दीड सेंटिमीटर लांबीचा होता.