शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गिफ्टच्या बहाण्याने दोन महिलांना ३३ लाखांना ऑनलाईन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:52 IST

सोशल मिडियावर ओळख वाढवून परेदशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचा बहाणा करुन वेगवेगळी कारणे सांगून महिलांकडून ऑनलाईन पैसे लुुबाडण्याचा प्रकार थांबता थांबेना़.

पुणे : सोशल मिडियावर ओळख वाढवून परेदशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचा बहाणा करुन वेगवेगळी कारणे सांगून महिलांकडून ऑनलाईन पैसे लुुबाडण्याचा प्रकार थांबता थांबेना़.  अशा प्रकारे दोन महिलांना ३३ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी शहरातील भारती विद्यापीठ आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. या प्रकरणी आंबेगाव येथील एका ५९ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठात फिर्याद दिली आहे़.  हीा प्रकार ऑक्टोंबर २०१९ ते फेबु्रवारी २०२० दरम्यान घडला़.  या महिलेला फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली होती़.  आपण थायलंड येथे राहत असून नामांकित कंपनीत कामाला आहे़. त्याच्याबरोबर या महिलेने फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग केले़. ईमेलवर माहितीची देवाण घेवाण केली़,  तिच्याशी मैत्री करुन विश्वास संपादन केला़. तिला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले़. त्यानंतर दिल्ली एअरपोर्टवरहे पार्सलमध्ये सोने व डॉलर असल्याने कस्टमने ते अडविले असल्याचे सांगितले़.  ते सोडविण्यासाठी व त्या पार्सलमधील डॉलर भारतीय चलनामध्ये रुपांतरीत करण्यासाठी व जी एस टी इन्शुरन्स अशी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेला वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले़.  त्याप्रमाणे या महिलेने तब्बल १५ लाख ७ हजार रुपये बँक खात्यात भरले.  तरीही आणखी पैशांची मागणी होत असल्याने तिला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले़.  त्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली़  सायबर पोलिसांनी यातील आरोपींचे नाव निष्पन्न करुन अधिक तपासासाठी भारती विद्यापीठाकडे गुन्हा वर्ग केला आहे़. असा प्रकार विमाननगर येथील एका ३० वर्षाच्या महिलेबाबत घडला़ या महिलेला लंडन येथून गिफ्ट पाठविले असल्याचे सांगण्यात आले होते़.  गिफ्टमध्ये सोने, महागड्या हँडबॅग व परदेशी चलन पाठविले असल्याचे भासविले़ दिल्ली येथीलकस्टम ऑफिसमध्ये अडकले आहे़.  ते सोडविण्यासाठी या महिलेला वेगवेगळ्या कारणासाठी १७ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यात भरायला लावण्यात आले़. त्यानंतरही कोणतेही गिफ्ट दिले नाही़ या महिलेने रक्कम परत मागितली असता पैसे परत करण्यास नकार देऊन तिची आर्थिक फसवणुक केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम