शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कार्यकर्ता हत्याप्रकरणी दोघे जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:49 IST

शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे.

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट याच्या हत्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. 

विनायक शिरसाट याची हत्या माहिती अधिकारासंबंधी नाही तर वैयक्तिक कारणातून झाल्याचे समजते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना पुण्यात आणल्यानंतर त्यांच्या चौकशीतून नेमके कारण पुढे येणार असून मुख्य आरोपीला पकडल्यानंतर ते अधिक स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी देण्यात आली होती.

तर शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांना धमक्या आल्या होत्या, याची माहिती दिल्यानंतरही पोलीस १० दिवस हातावर हात धरुन बसले. त्यामुळे या हत्येमागे हात असलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

टॅग्स :MurderखूनRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता