शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोन ठार; तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 02:42 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीट ३८ च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी कार सुरक्षेसाठी लावलेल्या क्रॅश बॅरियरमध्ये डाव्या बाजूने घुसली. यात क्रॅश बॅरियर डाव्या बाजूची हेड लाईट फोडून आत घुसला. समोर बसलेले मोतीराम मोतीवाले (७०) यांच्या शरीरात तो घुसला. तर त्यांच्या मांडीवर बसलेल्या शान (२) जखमी झाला. मागे बसलेली त्यांची सून मोहिनी(३०) व त्यांची नात खुशी (१५) जखमी झाल्या तर मागच्या सीटवर बसलेल्या उषा (६५) यांच्या पोटात शिरला. या अपघातात मोतीराम मोतीवाले आणि उषा मोतीवाले यांचा जागीच मृत्यू झाला.नातू शान, सून मोहिनी आणि नात खुशी यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सहप्रवासी किरण जीवन गुरसुंड या आश्चर्यकारकरित्या बचावल्या असून चालक देखील सुखरूप आहे.अपघात घडताच देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहचली आणि बचाव कार्य सुरु केले होते. रोडवेज पेट्रोलिंग, बोरघाट पोलीस टीम, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा यांनी तातडीने हालचाल करून जखमींना रूग्णालयात पाठवले. या बाबत पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग किसवे करीत आहेत.