शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांच्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी

By admin | Updated: March 14, 2016 00:17 IST

आठ अटकेत : विवस्त्र होऊन धिंगाणा; केळशी समुद्रकिनाऱ्यावरील घटना

दापोली : समुद्रात स्नानासाठी विवस्त्र उतरून पुण्यातील पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालण्याचा प्रकार दापोली तालुक्यातील केळशी समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सायंकाळी घडला. हा धिंगाणा पाहून संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना अटकाव करताच त्यांच्यावर या पर्यटकांनी धारदार हत्याराने हल्ला केला. यामध्ये दोघे शिक्षक जखमी झाले असून, पोलिसांनी पुण्यातील आठ पर्यटकांना अटक केली आहे. ऋषिकेश राजेंद्र नवगणे (वय २५, धनकवडी), प्रतिक शांतीलाल मुनोत (१७), सूरज सतीश काकडे (१९), ओंकार भरत काळे (१७), अनुस बनतोडे (१७), अक्षय सुर्यकांत खुटवड (२६), तन्मय बाळकृष्ण पोमण (१९, सर्व रा. महर्षीनगर, पुणे) व सिद्धांत मधुकर घाडगे (१९, निगडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.केळशी येथील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी पुणे येथून काही पर्यटक आले होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी किनाऱ्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. अंगावरील सर्व वस्त्र काढून ते समुद्रात स्नानाला उतरले. हा प्रकार पाहून केळशी येथील स्थानिक ग्रामस्थ सारिक साबीर शेख, मन्सूर फाते हे दोघेजण त्या पर्यटकांना समज देण्यासाठी गेले. अशा प्रकारचे गैरवर्तन करणे चालत नाही, तुम्हाला विवस्त्र अवस्थेत समुद्रकिनाऱ्यावर फिरू देणार नाही, अशी समज देताच पर्यटकांचा पारा आणखीन चढला. या पर्यटकांनी स्थानिकांना अर्वाच्च शिवीगाळ केली. शिवीगाळ करीतच पर्यटकांनी झायलो गाडीतील चॉपर आणि चाकू काढून स्थानिकांवर हल्ला केला. चाकूहल्ल्यानंतर या दोघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्याशेजारील स्थानिक ग्रामस्थ मदतीला धाऊन आले आणि पर्यटक पळून जाण्याच्या आत त्यांना पकडले. (प्रतिनिधी)